Jan Dhan Yojana: प्रधानमंत्री जनधन योजनेला (PMJDY) 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार, प्रत्येक बँक खातेधारकाने दरवर्षी KYC (Know Your Customer) पूर्ण करणे अनिवार्य आहे. यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. KYC पूर्ण न केल्यास खाते निष्क्रिय होऊ शकते.
निष्क्रिय खात्यांची संख्या वाढली
सप्टेंबर 2025 पर्यंत सरकारी बँकांमध्ये 26 टक्के जनधन खाती निष्क्रिय झाली आहेत. याआधी, एक वर्षापूर्वी ही संख्या 21 टक्के होती. बिझनेस मध्ये प्रकाशित अहवालानुसार, सप्टेंबर 2025 मध्ये सरकारी बँकांमध्ये एकूण 545.5 दशलक्ष खाती आहेत, त्यापैकी 142.8 दशलक्ष खाते निष्क्रिय आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष 2026 मध्ये 20 दशलक्ष नवीन जनधन खाती उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यापैकी 1.32 दशलक्ष खाते सप्टेंबरपर्यंत उघडण्यात आली आहेत.
हेही वाचा -Karnataka : नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा जातनिहाय सर्वेक्षणात सहभाग घेण्यास नकार; 'मागासवर्गात मोडत नाही,' अशी भूमिका
कुठल्या बँकेत सर्वाधिक निष्क्रिय खाती?
मोठ्या बँकांमध्ये, बँक ऑफ इंडियामध्ये सर्वाधिक निष्क्रिय जनधन खाती आहेत. या बँकेत 33 टक्के निष्क्रिय खाती आहेत. युनियन बँकेत 32 टक्के निष्क्रिय खाती आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेत 8 टक्के आणि पंजाब अँड सिंध बँकेत 9 टक्के निष्क्रिय खाती आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निष्क्रिय खात्यांची टक्केवारी वाढली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निष्क्रिय खात्यांची संख्या सप्टेंबर 2024 मध्ये 19 टक्क्यांवरून सप्टेंबर 2025 मध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
हेही वाचा - Gold Silver Price Today: धनत्रयोदशीपूर्वी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या! जाणून घ्या आजचे ताजे दर
निष्क्रिय खाते म्हणजे काय?
RBI च्या मार्गदर्शनानुसार, जर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणतेही व्यवहार झाले नसतील, तर बचत खाते निष्क्रिय म्हणजे Inactive मानले जाते.
PMJDY म्हणजे काय?
प्रधानमंत्री जनधन योजना ही गरीब आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवांशी जोडण्यासाठी सरकारची विशेष योजना आहे. यामध्ये शून्य बॅलन्स खात्यांसह बचत खाते, विमा आणि पेन्शन यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
जनधन खाते कसे सुरू करावे ?
कोणीही सरकारी किंवा खाजगी बँकेच्या शाखेत जनधन खाते उघडू शकतो. यासाठी किमान ठेवीची आवश्यकता नाही. जनधन खात्यात ठेवींवर व्याज मिळते. तसेच 1,00,000 रुपये अपघात विमा कव्हर, सामान्य परिस्थितीत 30,000 रुपये जीवन विमा मिळतो. तसेच हे खाते उघडण्यासाठी किमान बॅलन्स लागत नाही. याशिवाय, सर्व सरकारी योजनांमधून निधी थेट खात्यात हस्तांतरित केला जातो.