Raipur Steel Plant Structure Collapses: रायपूरमधील गोदावरी इस्पात लिमिटेडच्या सिलतारा परिसरातील स्टील प्लांटमध्ये शुक्रवारी इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यात पाच कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली.
प्राथमिक अहवालानुसार, या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात व्यापक बचाव कार्य सुरू आहे आणि अपघाताचे नेमके कारण सध्या तपासले जात आहे.
हेही वाचा - Girls Inside Madrasa bathroom : भयंकर! मदरशाच्या बाथरुममध्ये सापडल्या 40 मुली, तपासाअंती जे समोर आलं हे पाहून पोलिसही झाले अवाक्
स्थानिक प्रशासनाने मृत कामगारांच्या कुटुंबियांना धीर दिला असून जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची हमी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या गोदावरी इस्पात लिमिटेडच्या या प्लांटमध्ये सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का? याचा सध्या तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा - Sonam Wangchuk Arrested: लेह हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांना अटक; 'या' आरोपाखाली करण्यात आली कारवाई
दरम्यान, प्रशासन आणि पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. तथापी, मृत कामगारांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने छत्तीसगडमधील औद्योगिक सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला असून, स्थानिक प्रशासनाने तातडीने सर्व संबंधितांची चौकशी सुरू केली आहे.