Monday, May 11, 2026 11:15:44 AM

Money Laundering: 6.30 कोटींची रोकड, 7 कोटींचे दागिने, चांदीच्या विटा अन् लाखोंची घड्याळे; बड्या उद्योजकाच्या घरी ED च्या छाप्यात सापडला खजिना

अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांच्या दिल्ली व गुरुग्राम येथील कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यात अंमलबजावणी संचालनालयाला संपत्तीचा अक्षरशः खजिना सापडला आहे.

money laundering 630 कोटींची रोकड 7 कोटींचे दागिने चांदीच्या विटा अन् लाखोंची घड्याळे बड्या उद्योजकाच्या घरी ed च्या छाप्यात सापडला खजिना

Money Laundering: दिल्ली-NCR क्षेत्रात सक्तवसुली संचालनालयाने (ED) एका बड्या रिअल इस्टेट व्यावसायिकावर मोठी कारवाई केली आहे. 'अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' (Arth Infrastructure Limited) आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांच्या दिल्ली व गुरुग्राम येथील कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यात अंमलबजावणी संचालनालयाला संपत्तीचा अक्षरशः खजिना सापडला आहे. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत असताना ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे स्वरूप पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत.

रोकड, दागिने आणि महागड्या वस्तूंचा तपशील
या कारवाईदरम्यान ई़डीने तब्बल 6.30 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 7.5 कोटी रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश असून चांदीच्या विटाही सापडल्या आहेत. इतकेच नव्हे तर, या उद्योजकाच्या घरातून लाखांच्या किमतीची महागडी सोन्याची घड्याळेदेखील हस्तगत करण्यात आली आहेत. छाप्यानंतर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे मोठे बंडल आणि विविध मौल्यवान वस्तू तपासणीसाठी मांडून ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Ashok Kharat Case: 'माझं मरण इथेच...'; भोंदू बाबाच्या पापाचा घडा भरला, चौकशीत उत्तरं देताना अक्षरश: नाकीनऊ

कायदेशीर कारवाई आणि पुढील तपास
हे प्रकरण आर्थिक फसवणुकीशी संबंधित असून यापूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) यासंदर्भात एफआयआर (FIR) दाखल केला होता. 'गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने' (SFIO) दिलेल्या तक्रारीनंतर ई़डीने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला आणि ही धाड टाकली. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास पूर्ण होईपर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य सध्याच्या अंदाजित आकड्यापेक्षाही कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 


सम्बन्धित सामग्री