Saturday, July 12, 2025 12:04:07 AM

SL vs BAN: खेळाडूंची उडाली धांदल! क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावर घुसला 7 फूट लांब साप, पहा व्हिडिओ

पंचांना कॅमेऱ्यात मैदानावर काहीतरी रेंगाळताना दिसले, झूम केल्यानंतर, तो साप असल्याचे आढळले. यानंतर मैदानी पंचांनी क्रिकेट मॅट थांबवली.

sl vs ban खेळाडूंची उडाली धांदल क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावर घुसला 7 फूट लांब साप पहा व्हिडिओ
Snake Enters Ground During Cricket Match
Edited Image

Snake Entered Ground During Cricket Match: श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यादरम्यान, मैदानात साप दिसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर 2 जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली. या मालिकेतील पहिला सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यादरम्यान अचानक 7 फूट लांबीचा साप मैदानात आला, त्यानंतर खेळ काही काळासाठी थांबवावा लागला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

हेही वाचा - हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर! शिमल्यात 5 मजली इमारत पत्त्याच्या घरासारखी कोसळली, पहा व्हिडिओ

दरम्यान, पंचांना कॅमेऱ्यात मैदानावर काहीतरी रेंगाळताना दिसले, झूम केल्यानंतर, तो साप असल्याचे आढळले. यानंतर मैदानी पंचांनी खेळ थांबवला, तर आर प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफने तात्काळ सतर्कता दाखवली आणि सापाला मैदानाबाहेर काढले, त्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. श्रीलंकेत सामन्यादरम्यान अचानक मैदानात साप दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक सामन्यांमध्ये अशा घटना पाहायला मिळाल्या आहेत.

हेही वाचा - Boeing-737 विमान अपघातातून थोडक्यात बचावले; लँडिंग करताना विमान धावपट्टीवर एका बाजूला झुकले, पहा व्हिडिओ

एकदिवसीय मालिकेच्या या सामन्याच यजमान श्रीलंकेने हा सामना 77 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 49.2 षटकांत 244 धावांवर ऑलआउट झाला, त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशच्या संघाने एका वेळी 2 गडी गमावून 100 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांचा डाव 167 धावांवर संपुष्टात आला. 
 


सम्बन्धित सामग्री