Thursday, November 13, 2025 02:41:56 PM

Air India Flight Diverted: एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली विमानाचे मंगोलियात आपत्कालीन लँडिंग

रविवारी घडलेल्या या घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव वाचला असून विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.

air india flight diverted एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली विमानाचे मंगोलियात आपत्कालीन लँडिंग

Air India Flight Diverted: सॅन फ्रान्सिस्कोहून कोलकातामार्गे दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI174 या विमानात प्रवासादरम्यान संशयास्पद तांत्रिक बिघाड आढळल्याने मंगोलियातील उलानबाटार विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. रविवारी घडलेल्या या घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव वाचला असून विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.  

एअरलाइनने X (पूर्वीचे ट्विटर) वर दिलेल्या माहितीनुसार, 'AI174 हे विमान 2 नोव्हेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्कोहून कोलकातामार्गे दिल्लीकडे जात असताना, विमान कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाडाचा संशय आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे उलानबाटार येथे लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित असून विमानाची तांत्रिक तपासणी सुरू आहे.'

हेही वाचा - तरुणांची अरेरावी, वाहतूक पोलिसाला मारहाण करत फाडला गणवेश, व्हिडीओ व्हायरल

एअरलाइनने पुढे म्हटले आहे की, आम्ही आमच्या भागीदारांसह प्रवाशांना मदत करण्यासाठी कार्यरत आहोत आणि त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षितरीत्या पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या अनपेक्षित घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. एअर इंडियासाठी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.

हेही वाचा - OPEC+ Oil Output: धक्कादायक ! आठ देशांच्या 'या' निर्णयामुळे भारताच्या आर्थिक व्यवस्थेवर होणार परिणाम

दरम्यान, शनिवारी अशाच प्रकारची एक घटना नेपाळमध्ये घडली. श्री एअरलाइन्सच्या काठमांडूकडे जाणाऱ्या विमानात हायड्रॉलिक प्रणालीचा बिघाड झाल्याने धनगढीहून निघालेल्या फ्लाइट 222 ला भैरहवा येथील गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानातील सर्व 82 प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. घटनेनंतर विमान कंपनीने तत्काळ बदली विमानाची व्यवस्था करून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी रवाना केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना अत्यंत वेगाने आणि दक्षतेने हाताळण्यात आली असून हायड्रॉलिक बिघाडाचे मूळ कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री