नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत भारतातील सर्व पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली. आता पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवण्यात आली आहे. तथापि, बंदी उठवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. हानिया आमिर आणि माहिरा खान सारख्या अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंट्सवर अजूनही बंदी आहे.
हेही वाचा - पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामध्ये आत्मघातकी हल्ला, 13 सैनिक ठार; 'या' संघटनेने घेतली जबाबदारी
कोणत्या अकाउंट्सवरील बंदी उठवण्यात आली -
सनम तेरी कसम या बॉलिवूड चित्रपटात दिसणारी पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिचे इंस्टाग्राम अकाउंट आता भारतात सक्रिय आहे. तिच्याशिवाय सबा कमर, युमना झैदी, दानिश तैमूर, अहद रझा मीर यांसारख्या कलाकारांची अकाउंट देखील सक्रिय झाली आहेत. तथापी,
दिलजीत दोसांझसोबत सरदार जी 3 या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री हानिया आमिर हिचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात प्रतिबंधित आहे.
हेही वाचा - विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी अधिकारी तालिबानच्या चकमकीत ठार
यूट्यूब चॅनेलवर बंदी -
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारच्या कायदेशीर विनंतीमुळे पाकिस्तानी कलाकारांच्या अकाउंटवर बंदी घालण्यात आली होती. याशिवाय, गृह मंत्रालयाच्या शिफारशीवरून, भारत सरकारने 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली. या चॅनेलवर भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध भडकाऊ, सांप्रदायिक आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्याचा आरोप होता.