AC Temperature New Rule India: देशाच्या अनेक भागात सुरू असलेल्या कडक उन्हाळ्याच्या आणि उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, सरकारने एअर कंडिशनरचे तापमान नियंत्रित करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने एसीची तापमान मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी घोषणा केली आहे की लवकरच संपूर्ण भारतातील एसी 20 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस दरम्यानच काम करू शकतील. म्हणजेच, तुम्ही तुमचा एसी 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त सेट करू शकणार नाही. देशभरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीज वापर कमी करणे, ऊर्जा वाचवणे आणि चांगले ऊर्जा व्यवस्थापन सुनिश्चित करणे या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर, कंपन्यांना एअर कंडिशनरचे ऑपरेटिंग तापमान बदलावे लागेल. सध्या, अनेक एसी 16°C किंवा 18°C पर्यंत कूलिंग प्रदान करतात, परंतु नवीन प्रणाली अंतर्गत, किमान तापमान 20°C वर निश्चित केले जाईल. त्याच वेळी, हीटिंग मोडमध्ये तापमान 28°C पेक्षा जास्त वाढणार नाही. या निर्णयाचा परिणाम घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांवर होणार आहे.
हेही वाचा - Tatkal Ticket New Rules: तात्काळ तिकिट बुकिंगबाबत मोठा बदल! 1 जुलैपासून 'हे' लोक करू शकणार नाहीत तिकिटं बुक
दरम्यान, सरकार प्रथम ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवेल आणि नंतर त्याचे परिणाम मूल्यांकन करेल. या निर्णयामागील सरकारचा मुख्य हेतू राष्ट्रीय वीज ग्रिडवरील भार कमी करणे आणि ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देणे आहे. तथापि, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) नुसार, एसीच्या तापमानात प्रत्येक 1 अंश वाढ झाल्याने विजेचा वापर सुमारे 6% कमी होतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20°C ऐवजी 24°C वर एसी चालवला तर तुम्ही 24% पर्यंत वीज वाचवू शकता.
हेही वाचा - रॅपिडोची फूड डिलिव्हरी सेवा लवकरच सुरू होणार; स्विगी आणि झोमॅटोला देणार टक्कर
तथापी, आता सर्व एसी कंपन्यांना या नवीन नियमानुसार त्यांची उत्पादने पुन्हा प्रोग्राम करावी लागतील किंवा सॉफ्टवेअर अपडेट द्यावे लागतील. हा नियम घरे तसेच कार्यालये, मॉल आणि इतर व्यावसायिक ठिकाणी लागू होईल. अनेक देशांमध्ये एसी संदर्भात नियम आधीच लागू आहेत. जपानमध्ये ऑफिसमध्ये एसी 28°C वर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी एसी 27°C पेक्षा कमी ठेवता येत नाहीत. भारताचा नवीन नियम या देशांपेक्षा थोडा अधिक लवचिक आहे, परंतु तो घरे आणि कार्यालये दोन्हीसाठी लागू होईल.