Saturday, June 14, 2025 03:33:00 AM

Bengaluru Stampede: मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी भरपाईची रक्कम वाढवली; आता मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 'इतके' पैसे

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली भरपाई 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.

bengaluru stampede मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी भरपाईची रक्कम वाढवली आता मृतांच्या कुटुंबियांना मिळणार इतके पैसे
CM Siddaramaiah
Edited Image

बेंगळुरू: चिन्नास्वामी स्टेडियम दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली भरपाई 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. यापूर्वी सरकारने प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती.

हेही वाचा - बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारच्या अडचणी वाढल्या; उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

बेंगळुरूमधील चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू - 

बेंगळुरूमधील चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. आरसीबीच्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अनपेक्षितपणे मोठी गर्दी जमली होती, जी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती. स्टेडियममध्ये सुमारे 35 हजार आसन क्षमता होती परंतु घटनास्थळी सुमारे 2 ते 3 लाख लोक जमले होते. त्यामुळे ही चेंगराचेंदरी घडली. 

हेही वाचा - बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांनी तयारीसाठी मागितला होता वेळ

चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे आदेश - 

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक तरुण होते जे क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आले होते. अनेक जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे भविष्य धोक्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चेंगराचेंगरीचे कारण शोधण्यासाठी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत 15 दिवसांत अहवाल सादर केला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


सम्बन्धित सामग्री