Saturday, July 12, 2025 12:47:05 AM

किळसवाणा प्रकार! डिलिव्हरीपूर्वी दूध विक्रेता कॅनमध्ये थुंकला; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक

गोमतीनगरच्या विनय खांड परिसरातील एक दूध विक्रेता दुधामध्ये थुंकताना आढळला आहे. हा सर्व प्रकार घराच्या दारावर बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

किळसवाणा प्रकार डिलिव्हरीपूर्वी दूध विक्रेता कॅनमध्ये थुंकला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक
Edited Image

Milk Vendor Spit in Can: लखनऊमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. गोमतीनगरच्या विनय खांड परिसरातील एक दूध विक्रेता दुधामध्ये थुंकताना आढळला आहे. हा सर्व प्रकार घराच्या दारावर बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ फुटेजनंतर नेटीझन्स दूध विक्रेत्याविरोधात संताप व्यक्त करत आहेत. सुरुवातीला स्वतःची ओळख पप्पू अशी करून देणारा हा व्यक्ती मल्हारचा मोहम्मद शरीफ असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तो वर्षानुवर्षे गोमती नगरच्या विनय खांडमधील अनेक घरांना नियमितपणे दूध पुरवत होता.

व्हिडिओमध्ये दूधवाला घराची दाराची बेल वाजवतो, नंतर दुधाच्या डब्याचे झाकण उघडतो, ते तोंडाजवळ आणतो आणि शेवटी पुन्हा ते बंद करतो. हे संपूर्ण किळसवाणे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून गोमतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी दूधवाल्याला अटक केली आहे.

हेही वाचा - चक्क पाण्याच्या विहिरीत लागली आग.. रहस्य उलगडले तेव्हा संपूर्ण देशाचे नशीब पालटले!

दरम्यान, सनातन हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लव शुक्ला यांच्या मते, शरीफ शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचला. त्याने त्याची मोटारसायकल बंद असलेल्या गेटसमोर पार्क केली आणि घराची बेल वाजवली. घरातून कोणीही बाहेर येण्याआधीच, शरीफने दुधाच्या किटलीचे झाकण उघडले, ते तोंडाजवळ आणले. त्यानंतर तो त्यात थुंकला. त्यानंतर तो झाकण बंद करून दूध दिल्यानंतर निघून गेला. 

हेही वाचा - SL vs BAN: खेळाडूंची उडाली धांदल! क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावर घुसला 7 फूट लांब साप, पहा व्हिडिओ

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तथापी, या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप देखील व्यक्त होत आहे. या प्रकरणावर भाष्य करताना गोमतीनगरचे निरीक्षक ब्रजेश चंद्र तिवारी यांनी सांगितले की, दुध विक्रेत्याचा किटलीत थुंकतानाचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला. लव शुक्लाच्या तक्रारीवरून, आम्ही दूध दूषित करून ते विकल्याप्रकरणी दुध विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तथापी, आरोपी मोहम्मद शरीफला अटक करण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री