Friday, March 13, 2026 01:23:13 PM

PF Interest Rate: EPFO चा मोठा निर्णय, पीएफ खात्यांवर मिळणार 'इतका' व्याजदर

केंद्र सरकारची अधिकृत मोहोर उमटल्यानंतर, देशातील 7 कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल.

pf interest rate epfo चा मोठा निर्णय पीएफ खात्यांवर मिळणार इतका व्याजदर

PF Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सोमवारी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर 8.25 टक्के निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये देखील 2024-25 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर 8.25 टक्केच ठेवण्यात आला होता. ईपीएफओने 2024 मध्ये किरकोळ वाढ करून हा दर 8.25 टक्के केला होता, जो 2022-23 मध्ये 8.15 टक्के इतका होता. निवृत्तीनंतरच्या ठेवींवर सुरक्षित परतावा देणारी योजना म्हणून याकडे पाहिले जाते.

सरकारच्या मंजुरीनंतर 7 कोटी सदस्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम
ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या 'केंद्रीय विश्वस्त मंडळाने' (CBT) सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सीबीटीने निश्चित केलेला हा 8.25 टक्के व्याजदराचा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. केंद्र सरकारची अधिकृत मोहोर उमटल्यानंतर, देशातील 7 कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल. मार्च 2022 मध्ये हा दर 8.10 टक्क्यांपर्यंत खाली आला होता, जो 1977-78 नंतरचा सर्वात कमी दर मानला गेला होता.

हेही वाचा - BMC on Property Tax : मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट! आता मालमत्ता करात मिळणार मोठा दिलासा, करमाफीच्या प्रस्तावाला मंजूरी

गेल्या दशकभरातील व्याजदरांचा चढ-उतार
ईपीएफओच्या व्याजदरांचा इतिहास पाहिल्यास त्यात वेळोवेळी बदल झाल्याचे दिसून येते. 2013-14 आणि 2014-15 मध्ये हा दर 8.75 टक्के इतका होता, तर 2015-16 मध्ये तो 8.8 टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर हळूहळू व्याजदरात घट होत गेली. 2018-19 मधील 8.65 टक्क्यांवरून हा दर 2019-20 मध्ये 8.5 टक्क्यांवर आला होता. 2011-12 मध्ये देखील योगायोगाने व्याजदर 8.25 टक्केच होता. सध्याच्या महागाईच्या काळात व्याजदर स्थिर ठेवल्याने पगारदार वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे.


सम्बन्धित सामग्री