Mirzapur Train Accident: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनवर आज सकाळी एक भीषण रेल्वे अपघात झाला. रेल्वे रुळ ओलांडताना चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवार सकाळी सुमारे 9:30 वाजता हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, 12311 क्रमांकाच्या ट्रेनने रुळ ओलांडणाऱ्या चार प्रवाशांना जोरदार धडक दिली. हे प्रवासी ट्रेनमधून उतरून प्लॅटफॉर्मऐवजी विरुद्ध बाजूने उतरत होते, तेव्हाच विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली. अपघातात सर्व चार जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मदत व बचाव कार्य सुरू आहे.
हेही वाचा - Abhimanyu Drone: आता शत्रूही घाबरेल! भारतीय नौदलाचा नवा प्रयोग; ‘अभिमन्यु’ ड्रोन मिग-29K व राफेल-M सोबत घेणार भरारी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने कळवले की, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांना तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या असून, जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आदेश दिले आहेत.
हेही वाचा - Vijay Mallya: कर्नाटक हायकोर्टात विजय मल्ल्याची धाव; बँकांच्या वसुलीवर कायदेशीर वाद पुन्हा पेटला
प्रशासन सतर्क, तपास सुरू
अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने घटनेचा तपास सुरू केला आहे. सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने झालेला हा अपघात असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.