PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सणासुदीनंतर शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार या आठवड्यातच हा हप्ता जारी करू शकते. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत. तथापि, अजूनही काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, कारण त्यांचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झालेले नाही.
ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक
पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. जर तुमचे e-KYC झाले नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे 21 व्या हप्त्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. प्राप्त माहितीनुसार, 20 वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये जारी करण्यात आला होता, ज्यात 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले.
हेही वाचा - Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारचा निर्णय; उच्चस्तरीय समिती सादर करणार कर्जमाफीचा आराखडा
प्रधानमंत्री किसान योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, जी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य पुरवते. ती 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली, आणि तेव्हापासून लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. या योजनेअंतर्गत, दर चार महिन्यांनी 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात, म्हणजे वर्षभरात 6000 रुपयांची मदत मिळते.
हेही वाचा - Maharashtra Rain Alert : राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान; हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
पात्रता अटी
PM-KISAN योजनेसाठी शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
शेतकऱ्याकडे 2 हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असावी आणि ती त्यांच्या नावावर नोंदणीकृत असावी.
आधार कार्डशी जोडलेले सक्रिय बँक खाते असणे आवश्यक.
PM Kisan पोर्टलवर e-KYC पूर्ण करणे आवश्यक.
2000 रुपयांचा हप्ता थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे खात्यात जमा होतो.
पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले यापैकी फक्त एक व्यक्तीला योजनेचा लाभ मिळेल. हप्ता थांबू नये म्हणून आजच तुमचे e-KYC अपडेट करा आणि बँक खाते सक्रिय आहे याची खात्री करा.