Karnataka Deputy CM DK Shivakumar
Edited Image
बेंगळूरू: आयपीएल 2025 मध्ये आरसीबीने ट्रॉफी जिंकली. तथापि, चॅम्पियन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संघाचा आनंद शोकात बदलला. चिन्नास्वामी येथे संघाच्या उत्सवात सामील होण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले. आता प्रकरणाचा परिणाम आरसीबी संघ आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनवर झाला. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखाचा देखील समावेश आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आरसीबीच्या ब्रँड व्हॅल्यूवरही मोठा परिणाम झाला आहे. आरसीबी संघाच्या विक्रीचाही विचार केला जात असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू खरेदी करण्यास रस असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, डीके शिवकुमार यांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.
हेही वाचा - 'आम्ही कार्यक्रम आयोजित केला नव्हता...'; बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मोठे विधान
डीके शिवकुमार यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आरसीबी खरेदी करण्याच्या वृत्ताचे पूर्णपणे खंडन केले. ते म्हणाले की, 'मी वेडा नाहीये. मी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनशी बऱ्याच काळापासून जोडलेला आहे. बस्स, बाकी काही नाही. माझ्याकडे वेळ नाहीये. पण, मला व्यवस्थापनाचा भाग होण्याची ऑफर मिळाली आहे. मला आरसीबीची काय गरज आहे?' तथापि, संघाच्या मालकाने आरसीबी विकण्याच्या अफवांना पूर्णपणे नकार दिला आहे.
हेही वाचा - Bengaluru Stampede: मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी भरपाईची रक्कम वाढवली; आता मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 'इतके' पैसे
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 33 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. उच्च न्यायालयानेही या प्रकरणावर कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने आरसीबी मार्केटिंग प्रमुख निखिल सोसले यांची जामीन याचिकाही फेटाळली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जून रोजी होणार आहे.