Wednesday, June 25, 2025 01:57:26 AM

'मी स्वतःचे बलिदान देत आहे...'; बकरी ईदनिमित्त 60 वर्षीय व्यक्तीने चिरला गळा

60 वर्षीय इश मोहम्मद यांनी बकरी ईदच्या दिवशी स्वतःचा गळा चिरून अल्लाहला आपला बळी दिला आहे. ही घटना देवरिया जिल्ह्यातील गौरी बाजार पोलीस स्टेशन परिसरातील उधोपूर गावातील आहे.

मी स्वतःचे बलिदान देत आहे बकरी ईदनिमित्त 60 वर्षीय व्यक्तीने चिरला गळा
60-year-old man slits throat
Edited Image

लखनौ: ईद-उल-अजहा म्हणजेचं बकरीद निमित्त प्राण्यांची कुर्बानी दिली जाते, परंतु उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकल्यानतंर सर्वांनाच धक्कादायक बसला आहे. येथे 60 वर्षीय इश मोहम्मद यांनी बकरी ईदच्या दिवशी स्वतःचा गळा चिरून अल्लाहला आपला बळी दिला आहे. ही घटना देवरिया जिल्ह्यातील गौरी बाजार पोलीस स्टेशन परिसरातील उधोपूर गावातील आहे. वृत्तानुसार, इश मोहम्मद सकाळी ईदची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेले. त्यानंतर ते सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरी परतले. त्याची पत्नी हाजरा खातूनने सांगितले की, ते जवळच्या झोपडीत गेले जिथे बकरे ठेवली जात होती.

सुमारे एक तासानंतर, पत्नीला झोपडीतून त्याचा आवाज ऐकू आला. ती आत धावत आली तेव्हा तिने पाहिले की इश मोहम्मदचा गळा कापलेला होता आणि रक्त वाहत होते. जवळच एक चाकूही पडला होता. आरडाओरडा ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताबडतोब रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा -  Palghar Crime: अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

पोलिसांना सापडली सुसाईड नोट - 

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात लिहिले आहे की, एक व्यक्ती बकरीला आपल्या मुलाप्रमाणे वाढवतो आणि नंतर बकरीचे बलिदान देतो. तो देखील एक जिवंत प्राणी आहे, बलिदान दिले पाहिजे. मी अल्लाहच्या पैगंबराच्या नावाने स्वतःची बलिदान देत आहे. मला शांततेने दफन करा, कोणाचीही भीती बाळगू नका.

हेही वाचा -  पैठण तालुक्यात 2 वाहनांसह 31 म्हशींची पाचोड पोलिसांकडून सुटका

पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुसाईड नोटची चौकशी सुरू आहे. हे कोणत्याही मानसिक तणावाचे परिणाम आहे का? हे देखील पाहिले जात आहे. ईश मोहम्मदला तीन मुले आहेत. दोन मुले गावात राहतात, तर सर्वात धाकटा मुलगा मुंबईत काम करतो. ही घटना घडली तेव्हा मुले ईदच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेली होती. या घटनेमुळे त्यांची पत्नी आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
 


सम्बन्धित सामग्री