Mahua Moitra Dance With her husband
Edited Image
कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि बिजू जनता दलाच्या (बीजेडी) माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्या अलिकडेच झालेल्या लग्नाची संपूर्ण देशभरात वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान, आता महुआ आणि त्यांच्या पतीचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हे जोडपे 'रात के हमसफर' या क्लासिक बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे.
हेही वाचा - TMC खासदार महुआ मोईत्रा यांनी केले परदेशात लग्न; बीजेडी नेता बनले त्यांचे जीवनसाथी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लग्न 30 मे रोजी जर्मनीमध्ये झाले. या जोडप्याने नुकतेच जर्मनीतील बर्लिन येथे एका खाजगी समारंभात लग्न केले. या समारंभाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. लग्न मोठ्या प्रमाणात गुप्त ठेवण्यात आले होते. पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथून दोन वेळा खासदार राहिलेल्या मोईत्रा आणि ओडिशातील पुरी येथून चार वेळा खासदार राहिलेले मिश्रा यांनी त्यांचे लग्न जनतेपासून दूर साजरे करण्याचा निर्णय घेतला होता. या लग्नानंतर नेटीझन्स सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. तसेच अनेकांनी या जोडप्याचे अभिनंदन देखील केलं आहे.
हेही वाचा - रिंकूने बोटात अंगठी घालताच खासदार प्रिया सरोजच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू, पहा हृदयस्पर्शी क्षण
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी महुआ यांचे अभिनंदन केले. महुआच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाल्यावर, राजकीय पक्षांच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचे संदेश येऊ लागले. शशी थरूर यांनी 'चांगले मित्र आणि सहकारी' असे वर्णन करत दोघांनाही दीर्घ आणि आनंदी वैवाहिक आयुष्य, मिळावे अशा शुभेच्छा दिल्या.