Saturday, June 14, 2025 03:18:26 AM

मोठा अपघात टळला! उत्तराखंडमध्ये रस्त्यावर करण्यात आले हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, पहा व्हिडिओ

पायलटला हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड लक्षात आला. त्यानंतर त्याने हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे वृत्त असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही

मोठा अपघात टळला उत्तराखंडमध्ये रस्त्यावर करण्यात आले हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग पहा व्हिडिओ
Helicopter emergency landing on road At Uttarakhand
Edited Image

डेहराडून: उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात शनिवारी मोठा अपघात टळला. येथे एका खाजगी हेलिकॉप्टरचे रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टचा मागचा भाग जमिनीवर उभ्या असलेल्या कारवर आदळला. उत्तराखंडचे एडीजी, कायदा आणि सुव्यवस्था अधिकारी व्ही मुरुगेशन यांनी सांगितले की, गुप्तकाशी परिसरात ही घटना घडली. पायलटला हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड लक्षात आला. त्यानंतर त्याने हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे वृत्त असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. याशिवाय, ज्या कारला हेलिकॉप्टरचा मागचा भाग धडकला त्या कारचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी कोणीही कारमध्ये नव्हते.

हेही वाचा -  दिल्ली विमानतळावरून 114 उड्डाणे रद्द होणार; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या

हेलिकॉप्टर रस्त्यावर उतरल्याने परिसरात गोंधळ उडाला. लोकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली. तथापि, वैद्यकीय आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार हे हेलिकॉप्टर क्रेस्टेल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​होते. ते भाविकांना सिरसीहून केदारनाथ धाम मंदिराकडे घेऊन जात होते. बिघाडामुळे खबरदारी म्हणून हेलिकॉप्टर जवळच्या हेलिपॅडऐवजी रस्त्यावर उतरवावे लागले.

हेही वाचा -  Anti Submarine Warfare ARNALA: INS अर्नाळा’ची नौदलात दमदार एंट्री; देशातील पहिले अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट होणार कमिशन

उत्तरकाशीमधील हेलिकॉप्टर अपघातात 6 जणांचा मृत्यू - 

दरम्यान, 8 मे रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील भागीरथी नदीजवळ एक खाजगी हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) मते, एरोट्रान्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे हे हेलिकॉप्टर 200 ते 250 मीटर खोल दरीत कोसळले होते.  
 


सम्बन्धित सामग्री