मुंबई: देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचा दयाळूपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यांनी मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला 151 कोटी रुपयांचे बिनशर्त अनुदान दिले आहे. मुकेश अंबानी यांनी 1970 च्या दशकात येथून पदवी प्राप्त केली होती. प्रोफेसर एमएम शर्मा यांच्या 'डिव्हाईन सायंटिस्ट' या चरित्राच्या प्रकाशनासाठी आयोजित समारंभात मुकेश अंबानी यांनी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी) मध्ये तीन तासांपेक्षा जास्त वेळ घालवला. अंबानी यांनी स्पष्ट केले की, 151 कोटी रुपयांची ही देणगी त्यांच्यासाठी 'गुरु दक्षिणा' आहे, जी त्यांनी प्रोफेसर शर्मा यांच्या सूचनेनुसार दिली आहे.
हेही वाचा - मुकेश अंबानी एका दिवसात किती रुपये कमावतात? आकडा ऐकून व्हाल थक्क!
दरम्यान, या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी यूडीसीटीमध्ये प्रोफेसर शर्मा यांनी दिलेल्या पहिल्या व्याख्यानाने त्यांना कसे प्रेरित केले याबाद्दल सांगितलं. यावेळी मुकेश अंबानी म्हणाले की, 'माझे वडील धीरूभाई अंबानी यांच्याप्रमाणेच, प्रोफेसर शर्मा यांनीही भारतीय उद्योगाला अनुपस्थितीतून जागतिक नेतृत्वाकडे नेण्याचे स्वप्न पाहिले होते. या दोन धाडसी दूरदर्शींचा असा विश्वास होता की विज्ञान आणि तंत्रज्ञान, खाजगी उद्योजकतेसह एकत्रितपणे, समृद्धीचे दरवाजे उघडतील.'
हेही वाचा - काय सांगता! Antilia मध्ये चक्क एकही AC नाही!! मग मुकेश अंबानींचा हा राजवाडा थंड कसा राहतो?
दरम्यान, भारतीय रासायनिक उद्योगाच्या उदयासाठी प्रोफेसर शर्मा यांच्या प्रयत्नांचे श्रेय देत, अंबानी यांनी त्यांच्या भाषणात त्यांना 'राष्ट्र गुरु - भारताचे गुरु' असे संबोधले. गुरु दक्षिणेबद्दल बोलताना, अंबानी यांनी प्राध्यापक शर्मा यांच्या सूचनेनुसार आयसीटीला 151 कोटी रुपये बिनशर्त दान केले. जेव्हा ते आम्हाला काही सांगतात तेव्हा आम्ही फक्त ऐकतो. आम्हाला वाटत नाही. त्यांनी मला सांगितले, 'मुकेश, तुम्हाला आयसीटीसाठी काहीतरी मोठे करावे लागेल.' आज मला त्यांना दिलेला शब्द पाळताना आनंद होत असल्याची भावना यावेळी मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली.