Cloudburst in Himachal Pradesh: सध्या देशभरात नैऋत्यू मान्सून बरसत आहे. गेल्या आठवड्यापासून हिमाचल प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. मंडीमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बियास नदीत पूर आला आहे. भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेशात रेड अलर्ट जारी केला आहे. आतापर्यंत पावसासंबंधिच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. IMD ने 7 जुलैपर्यंत दिल्ली-पंजाबसह अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
हिमाचल प्रदेशात ढगफुटी -
मंडी, कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यात ढगफुटीच्या 17 घटना घडल्या आहेत, त्यापैकी एकट्या मंडीमध्ये 15 ठिकाणी ढगफुटी झाल्या आहेत. पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे राज्यात हादरून गेले आहे. मुसळधार पावसामुळे मंडी, कांगडा आणि हमीरपूरमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हिमाचल प्रदेशातील अनेक भागात ढगफुटी झाली असून वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हिमाचल प्रदेशातमध्ये रेड अलर्ट -
हवामान विभागाने राज्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, उत्तर हरियाणा, ईशान्य मध्य प्रदेश, दक्षिण उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर आणि उत्तर छत्तीसगड आणि गुजरात या भागांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे.
हेही वाचा - 'कोरोना लसीचा हृदयविकाराशी काहीही संबंध नाही'; सरकारचे मोठे विधान
दिल्लीत पावसाचा अंदाज -
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पाऊस पडल्याने शहरातील तापमानात झपाट्याने घट झाली आहे. आजही राजधानीच्या अनेक भागात पाऊस पडला आहे. हवामान खात्याने छत्तीसगडच्या सुमारे 16 जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. त्याच वेळी, बिहारच्या 26 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातही 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि 38 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - Parliament Security Breach Case: 2023 च्या संसद सुरक्षा भंग प्रकरणातील 2 आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबईत यलो अलर्ट -
याशिवाय, भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरी भागात मुसळधार पाऊस, ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.