Raja Raghuvanshi murder case
Edited Image
Raja Raghuvanshi Murder Case Update: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणाबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. इंडिया टुडेशी बोलताना शिलाँगचे डीआयजी यांनी सांगितले की, जेव्हा राजाची हत्या झाली तेव्हा सोनमने तीन मारेकऱ्यांसह राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात मदत केली. एवढेच नाही तर सोनमने एका मारेकऱ्यासोबत स्कूटीवर दहा किलोमीटरचा प्रवास केला. सुरुवातीला सोनमने सांगितले होते की, ती बेशुद्ध पडली होती आणि तिला माहित नव्हते की, ती गाजीपूरला कशी पोहोचली.
सोनमने दिली गुन्ह्याची कबुली -
सुरुवातीला पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु जेव्हा मेघालय पोलिसांनी पुरावे दाखवल्यानंतर तिची चौकशी केली तेव्हा तिच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. यानंतर सोनमने पतीच्या हत्येची कबुली दिली. तथापि, आता सोनमचा प्रियकर राज आणि सोनमने आपला गुन्हा कबूल केला आहे.
हेही वाचा - सोनमचा प्रियकर राज कुशवाह कोण आहे? प्रियकराच्या मदतीने कसा रचला पतीच्या हत्येचा डाव?
राजा रघुवंशी हत्याकांडातील 5 आरोपींना 8 दिवसांची पोलिस कोठडी -
दरम्यान, आता राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी शिलाँग न्यायालयाने सोनम, राज, विशाल, आकाश आणि आनंद यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी मागीतली होती. परंतु न्यायालयाने आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींची आज रात्री सदर पोलीस ठाण्यात चौकशी केली जाईल.
हेही वाचा - Raja Sonam Tragedy: खून, कटकारस्थान आणि विश्वासघात… इंदौरच्या सोनम-राजाच्या प्रेमकथेचा थरारक शेवट
इंदूरहून पत्नीसोबत हनिमूनसाठी शिलाँगला गेलेल्या राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर राजाची पत्नी सोनमवर संशय व्यक्त करण्यात आला होता. तथापि, तपासात सोनमबद्दल धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आरोपी सोनम रघुवंशीने एसआयटीने केलेल्या चौकशीदरम्यान तिचा गुन्हा कबूल केला आहे. सर्व पुरावे सादर करून सोनमची चौकशी करण्यात आली. ज्यानंतर सोनमने पतीच्या हत्येची कबूली दिली.