Rahul Gandhi On Ravneet Singh Bittu: ‘गद्दार मित्रा, तू परत काँग्रेसमध्ये येशील…’; राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेच्या मकर द्वारावर हायव्होल्टेज ड्रामा

काँग्रेस खासदारांच्या निदर्शनादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत बोटे दाखवली. राहुल गांधींनी बिट्टू यांना 'गद्दार मित्र' असे संबोधल्याने वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.<br/>

Rahul Gandhi On Ravneet Singh Bittu: ‘गद्दार मित्रा, तू परत काँग्रेसमध्ये येशील…’; राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेच्या मकर द्वारावर हायव्होल्टेज ड्रामा

Rahul Gandhi On Ravneet Singh Bittu:  संसदेच्या परिसरात आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. संसदेच्या मकर द्वारावर काँग्रेस खासदारांच्या निदर्शनादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत बोटे दाखवली. राहुल गांधींनी बिट्टू यांना ‘गद्दार मित्र’ असे संबोधल्याने वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

“गद्दार मित्रा, तू परत काँग्रेसमध्ये येशील…”
मकर द्वारावर निलंबित खासदारांच्या आंदोलनादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू तिथून जात असताना राहुल गांधींनी त्यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी उपरोधिकपणे म्हणाले, “बघा, एक गद्दार तिथून जात आहे. त्याचा चेहरा पहा.” त्यानंतर हस्तांदोलन करत त्यांनी बिट्टू यांना टोला लगावला की, “नमस्कार भाऊ, माझा गद्दार मित्र. काळजी करू नकोस, तू पुन्हा काँग्रेसमध्ये येशील.” रवनीत बिट्टू हे पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या ते केंद्रात मंत्री आहेत.

हेही वाचा – 3 Sisters Jump to Death: कोरियन गेमच्या नादात 3 बहिणींचा जीव गेला, मध्यरात्री खिडकी उघडली अन् तिघींनी 9व्या मजल्यावरून उड्या मारल्या

रवनीत बिट्टूंचे जशास तसे प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या या विधानावर बिट्टू यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी राहुल गांधींशी हस्तांदोलन करण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्यांना ‘देशाचे शत्रू’ असे संबोधले. ‘ज्यांना मी देशाचे शत्रू मानतो, त्यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही,’ असे म्हणत बिट्टू यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. या वादानंतर दोन्ही नेत्यांमध्ये संसदेच्या पायऱ्यांवर बराच वेळ बाचाबाची सुरू होती.

निलंबित खासदारांचे आंदोलन
दुसरीकडे, भारत-अमेरिका व्यापार करारावरून पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेस खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. ‘पंतप्रधानांनी स्वतःच करार केला आहे’ असे लिहिलेले पोस्टर्स त्यांच्या हातात होते. या निदर्शनांमध्ये काँग्रेसच्या निलंबित सात आणि माकपच्या एक अशा एकूण आठ खासदारांचा समावेश होता. बेशिस्त वर्तणुकीचा ठपका ठेवत त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number