Saturday, February 14, 2026 09:48:26 PM

Udhampur Encounter: उधमपूरच्या जंगलात जैशच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने स्फोटाने उडवली गुहा

एका नैसर्गिक गुहेत लपलेल्या या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने 'ऑपरेशन किया' राबवून ती गुहाच स्फोटाने उद्ध्वस्त केली.

udhampur encounter उधमपूरच्या जंगलात जैशच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा लष्कराने स्फोटाने उडवली गुहा

Udhampur Encounter:  जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी उधमपूर जिल्ह्यात मोठी कारवाई करत जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. उधमपूरमधील बनसंतगड भागातील जाफर जंगलात ही चकमक झाली. विशेष म्हणजे, एका नैसर्गिक गुहेत लपलेल्या या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने 'ऑपरेशन किया' राबवून ती गुहाच स्फोटाने उद्ध्वस्त केली.

नैसर्गिक गुहेत लपले होते दहशतवादी
मंगळवारी दुपारी रामनगरच्या जंगली भागात भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम हाती घेतली होती. दुपारी 4 च्या सुमारास सुरक्षा दलांना एका नैसर्गिक गुहेत दहशतवादी लपल्याचे दिसून आले. त्यानंतर सुरू झालेल्या भीषण गोळीबारात एक दहशतवादी जखमी झाला, परंतु तो त्याच्या साथीदारासह गुहेत पळून गेला. संध्याकाळी 7:30 च्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क सुरक्षा दलांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

हेही वाचा - 3 Sisters Jump to Death: कोरियन गेमच्या नादात 3 बहिणींचा जीव गेला, मध्यरात्री खिडकी उघडली अन् तिघींनी 9व्या मजल्यावरून उड्या मारल्या

अंतिम हल्ला आणि गुहेचा स्फोट
दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्यानंतर, लष्कराने अंतिम हल्ल्याची तयारी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पॅराट्रूपर्स, डॉग स्क्वॉड आणि अत्याधुनिक ड्रोन्स पाचारण करण्यात आले होते. बुधवारी सकाळी लष्कराने निर्णायक कारवाई करत ज्या गुहेत दहशतवादी लपून गोळीबार करत होते, त्या गुहेचे प्रवेशद्वारच स्फोटकांनी उडवून दिले. या कारवाईत दोन्ही दहशतवादी जागीच ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे संशय असून ते जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.
 


सम्बन्धित सामग्री