12.27 PM : आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही
12.24 PM : पादत्राणे, बॅटरी, मायक्रोओव्हन, टीव्ही स्वस्त
12.23 PM : वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या वस्तूंवर आयातशुल्कात घट
12.21 PM : ऑप्शन ट्रेडिंगवरील करात वाढ, फ्युचर्सवरील एसटीटी वाढवून 0.05%, भांडवली बाजारातील शेअर्समध्ये मोठी घसरण
12.18 PM : मद्यप्रेमींना मोठा झटका, किंमती वाढणार
12.15 PM : भारतात डेटा सेंटर सुरू करणाऱ्यांना मोठी सूट दिली जाणार
12.13 PM : अघोषित संपत्तीची मर्यादा आता 1 कोटीपर्यंत करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले
12.09 PM : छोट्या करचोरी प्रकरणात आता कोणतीही शिक्षा होणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले
12.06 PM : आता 31 ऑगस्टपर्यंत ITR भरता येणार
12.05 PM : अपघाती विम्यावर मिळणारी रक्कम करमुक्त
12.01 PM : 1 एप्रिल 2026 पासून नवा सुलभ प्राप्तिकर कायदा लागू
11.55 AM : चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट 4.4 %
11.54 AM : काजूचे उत्पादन वाढवण्यावर भर देणार, भारतीय चंदनाची परिसंस्था टिकविण्यासाठी योजना
11.52 AM : दिव्यांग सहारा योजनेची घोषणा
11.50 AM : पशुपालन उद्योगासाठी अनुदान देणार
11.49 AM : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यावर अधिक भर दिला जाणार
11.47 AM : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटलिटीची घोषणा, 20 महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळी 10 हजार गाईडना प्रशिक्षण
11.46 AM : पूर्व भारतात नवे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन सुरू करणार
11.43 AM : प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारले जाणार
11.41 AM : Animation, Gaming उद्योगाला बळ देण्यासाठी 15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार
11.39 AM : 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा तयार करणार, गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुर्वेद चिकित्सा केंद्र
11.38 AM : इलेक्ट्रॉनिकपार्ट च्या निर्मितीसाठी 40 हजार कोटी
11.37 AM : कंटेनर उत्पादनाच्या योजनेसाठी पाच वर्षांच्या कालावधीत 10,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद
11.36 AM : पर्यटन वाढीसाठी सी प्लेन सुरू करण्याबाबत मोठी घोषणा
11.34 AM : 2047 पर्यंत कोस्टल शिपिंगमध्ये भारताचा हिस्सा दुप्पट केला जाणार
11.33 AM : टीयर २, टीयर ३ शहरे, तीर्थस्थळे यांच्यासाठी पाच हजार कोटींची घोषणा
11.31 AM : बायो फार्मा क्षेत्रासाठी तब्बल 10,000 कोटी रुपयांची तरतूद
11.30 AM : मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तसेच पुणे-हैदराबाद, दिल्ली-वाराणसी रेल कॉरिडॉर
11.29 AM : कापूस उत्पादनासाठी नवीन योजना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता
11.26 AM: लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी 10000 कोटींचा एसएमई ग्रोथ फंड
11.25 AM : वस्रोद्योग, हातमाग, हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना सुरू करणार
11.24 AM : दुर्मीळ खनिजांचा साठा, विकास आणि प्रभावी वापर यासाठी विशेष औद्योगिक पट्टा तयार करणार
11. 23 AM : सेमीकंडक्टर उद्योगासाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद
11.21 AM : भारतात औषधं निर्मिती केंद्रांची निर्मिती. क्लिनिकल रिसर्च, संशोधनाला बळ
11.20. AM : कर्करोग, मधुमेहावरील औषधांच्या किमती कमी होणार
11.18 AM - केंद्रीय अर्थसंकल्पात तीन कर्तव्यांवर भर -
1- आर्थिक विकासाला वेग देणे आणि स्थायी आर्थिक विकास करणे
2 - नागरिकांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे
3- सबका साथ सबका विकास या धोरणाला अनुकूल निर्णय घेणार
11.15 AM : युवकांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प बनवण्यात आला आगहे. युवाशक्ती बजेट असं वर्णन केले गेले आहे
11.11 AM : देशातंगर्त उत्पादन वाढवण्यावर आमचा भर - निर्मला सितारमण
11.10 AM : आत्मनिर्भर भारत हे सरकारचे सर्वात प्रमुख लक्ष्य
11.06 AM : लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू - निर्मला सितारमण
11.02 AM : अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात
10.15 AM: अर्थमंत्री निर्मला सीतारामण अगदी काही वेळातच संसदेत अर्थसंकल्प सादर करणार
10.4 AM : अर्थसंकल्पाला राष्ट्रपतींची मान्यता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतल्यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसद भवनात पोहोचल्या. या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
9.55 AM : 2026 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत 11 वाजता सादर करणार आहेत.
9.50 AM : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि अर्थसंकल्पाची एक प्रत राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला
9:46 AM : राष्ट्रपती भवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण दाखल