Monday, May 12, 2025 07:31:36 PM

उत्तराखंड सरकारचा मोठा आदेश! चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा स्थगित

उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा बंद आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या सेवा बंद राहतील.

उत्तराखंड सरकारचा मोठा आदेश चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा स्थगित
Helicopter service suspended for Chardham Yatra 2025 प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

डेहराडून: चारधाम यात्रेअंतर्गत बाबा केदारनाथला जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. उत्तराखंड सरकारने यासंदर्भात एक आदेशही जारी केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा बंद आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या सेवा बंद राहतील.

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवर तणाव वाढत असताना चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानकडून भारतीय भूभागावर सतत हल्ले होत आहेत, ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रतिउत्तर दिलं आहे. तत्पूर्वी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रिया उपकरणे आणि आवश्यक वैद्यकीय संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा - India Pakistan Ceasefire: भारताने स्वतःच्या अटींवर केली युद्धबंदी; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती

दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटलं की, भारताकडून दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे, त्यामुळे सचिवालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार राहण्याचे आणि सीमावर्ती भागात विशेष दक्षता घेण्याचे तसेच तेथे तैनात असलेल्या प्रशासकीय युनिट्सना सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

हेही वाचा - India- Pakistan Agree On Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी सहमत; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

राज्यात आवश्यक अन्नपदार्थ, रेशन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तथापि, बैठकीत माहिती विभागाला अफवा टाळण्यासाठी आणि जनतेला वेळेवर माहिती देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री