बेंगळुरू: एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 4 जून रोजी झालेल्या विजयी उत्सावादरम्यान स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, कर्नाटक सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चेंगराचेंगरी प्रकरणावर मोठे विधान केले आहे. आम्ही समारंभ आयोजित केला नव्हता, तर कर्नाटक क्रिकेट बोर्डाने आम्हाला आमंत्रित केले होते, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केलं आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरून टीकेचा सामना करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, ते केवळ आमंत्रित असल्यामुळेच कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांना सांगण्यात आले होते की राज्यपाल देखील कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केएससीएचे सचिव आणि कोषाध्यक्ष आले आणि त्यांनी मला आमंत्रित केले. आम्ही समारंभ आयोजित केला नव्हता. त्यांनी मला सांगितले की राज्यपालही येत आहेत, असंही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - Bengaluru Stampede: मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी भरपाईची रक्कम वाढवली; आता मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 'इतके' पैसे
चेंगराचेंगरीवरून राजकीय गोंधळ -
या घटनेने राजकीय गोंधळही निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री आणि जेडी(एस) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी आरोप केला आहे की, संघ जिंकला की नाही याची पर्वा न करता हा कार्यक्रम आधीच नियोजित होता. एफआयआरमध्ये म्हटले आहे की 4 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रमासाठी परवानगी मागितली गेली होती.
हेही वाचा - मोठी बातमी! बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल
तथापि, भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही कर्नाटक सरकारवर टीका करत म्हटले आहे की, 'विधान सौधाच्या पायऱ्या आतापर्यंत फक्त शपथविधी किंवा राज्य कार्यक्रमांसाठी वापरल्या जात होत्या. तुम्ही त्याचा वापर एका खाजगी संघाच्या उत्सवासाठी केला, हा सरकारी जागेचा गैरवापर आहे.