नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आता असं म्हटलं जातं आहे की, जुलै महिन्यात केंद्रातील सत्ताधारी पक्षाला निश्चितच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळतील. कारण, बहुतेक राज्यांना नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. तथापी, नवीन कार्यकारिणी निश्चित झाली आहे. यावेळी भाजप महिला नेत्याची निवड राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करू शकते, अशा अटकळा बांधल्या जात आहेत. यासाठी सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारमण. कारण निर्मला सीतारमण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू आहेत.
हेही वाचा - नीती आयोगाचे माजी CEO अमिताभ कांत यांची इंडिगोच्या गैर-कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती
दिल्लीतील अलिकडच्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे एका महिलेकडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे आता मोदी यावेळी पक्ष राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे एका महिलेकडे सोपवू शकतात. यासाठी आता सीतारमण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अर्थमंत्री म्हणून काम करणाऱ्या निर्मला सीतारमण यांनीही पक्षात आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. त्यांना केंद्र सरकारमध्ये काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. निर्मला सीतारमण दक्षिण भारतीय असणे हा देखील एक मोठा घटक आहे. त्यांचे अध्यक्ष होणे पक्षाला दक्षिण भारतात विस्तारण्याचा मार्ग देऊ शकते.
हेही वाचा - उत्तर प्रदेशात नोकऱ्यांमध्ये SC-ST आणि OBC मिळणार आरक्षण; कशी होणार भरती? जाणून घ्या
निर्मला सीतारमण यांनी देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ जेएनयूमधून अर्थशास्त्रात एमफिल पदवी प्राप्त केली आहे. 2008 मध्ये भाजपमध्ये सामील होऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सीतारमण यांना 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. त्यामुळे आता निर्मला सीतारमन यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या यादीत असल्याच्या अटकळा बांधल्या जात आहेत.