Andhra Pradesh News: आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. बुक्करायसमुद्रम मंडलमधील कोरापाडुजवळ असलेल्या एका शाळेत 17 महिन्यांची म्हणजेच दीड वर्षाची चिमुकली उकळत्या दुधाच्या मोठ्या पातेल्यात पडली आणि तिला भाजले. तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. स्वयंपाकघरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव अक्षिता आहे. तिची आई कृष्णवेणी या गुरुकुल शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात अक्षित आईसोबत शाळेत आली होती आणि त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
हेही वाचा: Man Swallowed 50 Objects : भयंकर! 29 चमचे, 19 टूथब्रश, 2 पेन; शस्त्रक्रीया करून काढल्या या व्यक्तीच्या पोटातून वस्तू
नेमकं काय घडलं?
अक्षिता आईसोबत गुरुकुल शाळेत आली होती. सुरक्षा रक्षक असल्याने आई कृष्णवेणी कामात व्यस्त असताना अक्षिता खेळत होती. खेळत असताना ती शाळेच्या स्वयंपाकघरात गेली. विद्यार्थ्यांना देण्यासाठी ठेवलेले उकळते दूध पंख्याखाली थंड होण्यासाठी ठेवले होते. अक्षिता याच मोठ्या पातेल्याजवळ खेळत होती. तिथे एक मांजर आले, त्या मांजराला पाहण्यासाठी ती त्याच्यामागे गेली. या गडबडीत अक्षिता गरम दुधाच्या भांड्यात पडली. दुधात पडताच भाजल्यामुळे ती चिमुकली मोठ्याने ओरडू लागली. तिने भांड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण तिला बाहेर येता आले नाही.
चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची आई कृष्णवेणी ताबडतोब स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी त्वरित मुलीला गरम दुधातून बाहेर काढले आणि तिला घेऊन अनंतपूरच्या सरकारी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर, पुढील चांगल्या उपचारासाठी मुलीला कुरनूल येथील सरकारी रुग्णालयात हलवण्याची शिफारस केली. परंतु अक्षिता खूप जास्त भाजली असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.