Saturday, February 14, 2026 04:36:50 AM

Turkish Plane Emergency Landing: मोठा अपघात टळला ! कोलकाता विमानतळावर तुर्की विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; इंजिनमधून निघाल्या ठिणग्या

विमानाच्या उजव्या इंजिनमधून ठिणग्या निघताना दिसल्याने पायलटने प्रसंगावधान राखून कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क साधला.

turkish plane emergency landing मोठा अपघात टळला   कोलकाता विमानतळावर तुर्की विमानाचे इमर्जन्सी लँडिंग इंजिनमधून निघाल्या ठिणग्या

Turkish Plane Emergency Landing: काठमांडूहून इस्तंबूलला जाणाऱ्या तुर्की एअरलाइन्सच्या विमानाचे आज कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने लँडिंग (Full Emergency Landing) करण्यात आले. विमानाच्या उजव्या इंजिनमधून ठिणग्या निघताना दिसल्याने पायलटने प्रसंगावधान राखून कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क साधला. दुपारी 2:49 वाजता हे विमान सुखरूप जमिनीवर उतरवण्यात आले.

236 प्रवाशांचा जीव टांगणीला
तुर्की एअरलाइन्सच्या 727 या विमानात एकूण 236 प्रवासी होते. विमान कोलकात्याच्या आकाशात असतानाच पायलटने इंजिनमध्ये आग लागण्याची शक्यता असल्याचे एटीसीला कळवले होते. आपत्कालीन लँडिंगचा सिग्नल मिळाल्यानंतर धावपट्टी रिकामी करण्यात आली. विमानतळ संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी सुरक्षित असून विमानाची तांत्रिक तपासणी आणि दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. प्रवासी पुढील प्रवासासाठी विमानतळावरच थांबले आहेत.

हेही वाचा - Mary Kom Apology Video : "खूप वर्षांपासून माझ्या मनात दुःख..." अखेर मेरी कॉमने तिच्या वादग्रस्त विधानाबाबत मागितली माफी

मुंबईत विमानांची किरकोळ धडक
दरम्यान, एकीकडे कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग झाले असताना, मंगळवारी मुंबई विमानतळावरही एक थरारक घटना घडली. एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन विमानांच्या पंखांची टोके एकमेकांना घासली. एअर इंडियाचे विमान AI2732 टेकऑफसाठी वाट पाहत असताना आणि इंडिगोचे विमान उतरत असताना ही टक्कर झाली. या घटनेमुळे दोन्ही एअरबस A320 विमानांचे नुकसान झाले असून, त्यांना अधिक तपासासाठी 'ग्राउंड' (सेवेतून बाहेर) करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या