Sunday, February 08, 2026 07:11:00 AM

Employees Salary Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! अर्थ मंत्रालयाकडून 8 हजार कोटींचे पॅकेज मंजूर; पाहा तुमच्या खात्यात किती पैसे येणार?

अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी वेतन आणि पेन्शन सुधारणेच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्याने, सरकारी तिजोरीतून 8 हजार कोटींहून अधिक रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

employees salary hike सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी अर्थ मंत्रालयाकडून 8 हजार कोटींचे पॅकेज मंजूर पाहा तुमच्या खात्यात किती पैसे येणार

Employees Salary Hike: केंद्र सरकारच्या वतीने लाखो कर्मचारी आणि निवृत्त धारकांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट जाहीर करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी वेतन आणि पेन्शन सुधारणेच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्याने, सरकारी तिजोरीतून 8 हजार कोटींहून अधिक रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणाकोणाला मिळणार लाभ?

या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा प्रामुख्याने खालील संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार आहे:

- सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या (GIC)
- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
- नाबार्ड (NABARD)
- प्रादेशिक ग्रामीण बँका

विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर एरियर'

विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही वेतन सुधारणा 1 ऑगस्ट 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.

एकूण लाभार्थी: सुमारे 93,000 (यात कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा समावेश आहे).
थकबाकी (Arrears): तब्बल 5,822.68 कोटी रुपये केवळ थकबाकीपोटी दिले जातील.
नवा खर्च: एकूण 8,170.30 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे.

हेही वाचा - Income Tax Exemption Limit : 15 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न होणार करमुक्त? अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकराविषयी मध्यमवर्गीयांच्या 'या' अपेक्षा पूर्ण होणार का?

RBI आणि नाबार्डमधील पेन्शनमध्ये 10 टक्क्यांची वाढ

RBI आणि नाबार्डमधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी सुधारणा मंजूर झाली आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून ही वाढ लागू होईल. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ पेन्शन आणि महागाई भत्त्यात (DA) 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. यासाठी सरकारवर 2,696.82 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या