नवी दिल्ली : बिगर-बासमती सफेद तांदळाच्या निर्यातीवरील सीमा शुल्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महसूल विभागाने शुक्रवारी रात्री उशिरा यासंबंधीची अधिसूचना जारी केली. याशिवाय उसना तांदूळ, तपकिरी तांदूळ (ब्राउन राइस) आणि धान यांच्यावरील निर्यात शुल्क घटवून १० टक्के करण्यात आले आहे. तांदळांच्या या जातींसह बिगर-बासमती सफेद तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क होते. अधिसूचनेत म्हटले आहे की, नवीन दर २७ सप्टेंबर २०२४ पासून लागू होतील.