Wednesday, February 18, 2026 05:39:04 PM

AI-Generated Resumes : लिंक्डइनवर AI चा धुमाकूळ; 74 टक्के कंपन्यांना उमेदवार शोधण्यात अडचणी, AI-जनरेटेड रिझ्युमेमुळे वाढली डोकेदुखी

लिंक्डइनच्या एका नवीन अहवालानुसार, देशातील 74 टक्के कंपन्यांना पात्र उमेदवार शोधण्यात प्रचंड अडचणी येत आहेत.

ai-generated resumes  लिंक्डइनवर ai चा धुमाकूळ 74 टक्के कंपन्यांना उमेदवार शोधण्यात अडचणी ai-जनरेटेड रिझ्युमेमुळे वाढली डोकेदुखी

AI-Generated Resumes : भारतातील नोकरी बाजारपेठ (Job Market) सध्या एका वेगळ्या आव्हानाचा सामना करत आहे. लिंक्डइनच्या एका नवीन अहवालानुसार, देशातील 74 टक्के कंपन्यांना पात्र उमेदवार शोधण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार केलेले रिझ्युमे (Resumes) कंपन्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. अर्ध्याहून अधिक (53 टक्के) कंपन्यांनी मान्य केले आहे की, त्यांच्याकडे येणाऱ्या अर्जांमध्ये एआय-जनरेटेड रिझ्युमेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

रिझ्युमेचा पाऊस, पण कौशल्याचा दुष्काळ
अहवालानुसार, 2022 पासून भारतात एका नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. भरती प्रक्रियेत महामारीपूर्व काळापेक्षा 40 टक्के वाढ झाली असली, तरी खऱ्या गुणवत्तेचा अभाव दिसून येत आहे. 48 टक्के भरती अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिझ्युमेच्या अतोनात गर्दीमुळे खऱ्या आणि योग्य अर्जांची वर्गवारी करणे कठीण झाले आहे. याव्यतिरिक्त, 47 टक्के कंपन्यांनी बाजारात मागणी असलेल्या विशेष कौशल्यांची (Skills) कमतरता असल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा - RBI Monetary Policy: भारत-अमेरिका व्यापार कराराचा RBI च्या धोरणावर परिणाम; रेपो दर कपातीला लागणार ब्रेक?

उपाय म्हणून पुन्हा 'AI'चाच आधार
गमतीची गोष्ट म्हणजे, ज्या एआयमुळे रिझ्युमेची गर्दी वाढली आहे, त्याच एआयचा वापर आता कंपन्या योग्य उमेदवार शोधण्यासाठी करत आहेत. सुमारे 71 टक्के भरती करणाऱ्यांच्या मते, एआयमुळे त्यांना अशा उमेदवारांचा शोध घेता आला ज्यांची कौशल्ये पूर्वी सापडणे कठीण होते. तर 76 टक्के कंपन्यांनी मानले आहे की, एआयमुळे त्यांची भरती प्रक्रिया वेगवान झाली आहे. आगामी काळात 80 टक्के कंपन्या स्क्रीनिंग आणि टॅलेंट हंटसाठी एआयचा वापर वाढवण्याच्या तयारीत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री