Monday, December 15, 2025 03:45:41 AM

Gujarat Ambulance Fire: गुजरातमध्ये चालत्या रुग्णवाहिकेला आग; नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू

मंगळवारी पहाटे एका चालत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू झाला.

gujarat ambulance fire गुजरातमध्ये चालत्या रुग्णवाहिकेला आग नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू

Gujarat Ambulance Fire: गुजरातमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. अरावली जिल्ह्यातील मोडासा शहराजवळ मंगळवारी पहाटे एका चालत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक डी. बी. वाला यांच्या माहितीनुसार, आजारी असलेल्या एका दिवसाच्या बाळाला मोडासातील खाजगी रुग्णालयातून अहमदाबादमधील दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले जात होते. त्याच दरम्यान, मोडासा-आणंद मार्गावर रुग्णवाहिकेला अचानक आग लागली. 

हेही वाचा - Delhi Red Fort Bomb Blast : इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यासारखाच... लाल किल्ला बॉम्बस्फोटात नवा खुलासा, मोठी माहिती समोर

या भीषण आगीत नवजात बाळ, त्याचे वडील जिग्नेश मोची (38), अहमदाबादमधील डॉक्टर शांतीलाल रेंटिया (30) आणि अरावलीमधील परिचारिका भूरीबेन मानत (23) यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीच्या आत अडकलेल्या या चौघांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या घटनेत जिग्नेश मोचीचे दोन नातेवाईक, खाजगी रुग्णवाहिका चालक आणि इतर तिघे जण गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - Bihar Cabinet Formulation: बिहार निवडणुकांनंतर विधानसभा अध्यक्षपदावरून भाजपा आणि जेडीयू आमने-सामनेे

एसपी डी. बी. वाला यांनी सांगितले की, मृत जिग्नेश मोची हा महिसागर जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याच्या बाळावर जन्मानंतर मोडासातील रुग्णालयात उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी अहमदाबादला नेत असताना रस्त्यातच रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रुग्णवाहिकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 


सम्बन्धित सामग्री