Thursday, May 22, 2025 05:40:21 PM

पहलगाम हल्ल्याचं समर्थन करणं भोवलं; सोलापुरात अजहर असिफ शेख याला अटक

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.

पहलगाम हल्ल्याचं समर्थन करणं भोवलं सोलापुरात अजहर असिफ शेख याला अटक

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापूरातील करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील युवकाने पहलगाम घटनेच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने समाजाच्या भावना दुखावणे व चिथावणीखोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली. वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी शेलगाव वांगी येथील अजहर असिफ शेख याच्याविरोधात करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

हेही वाचा : संजय गायकवाड यांना समज द्या; फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

तक्रारीत काय म्हटलं? 
यासंदर्भात तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी राजुरी येथे घरी असताना माझा मित्र नागेश पंडीत वाळुंजकर (रा. शेलगाव वांगी ता. करमाळा) याने मला सांगितले कि, मोबाईलवर शेलगाव वांगी येथे हिंदू समाजाच्या भावना भडकवणारे कोणीतरी आक्षेपार्ह स्टेटस ठेवले आहे. 25 एप्रिल रोजी सकाळी 8.45 मिनिटांनी माझे मोबाईलवर सदर स्टेटसचा फोटो मी नागेष वाळुंजकर याच्याकडून मागवून घेऊन त्या स्टेटसच्या फोटोची पाहणी केली असता अजहर असिफ शेख रा. शेलगाव वांगी याने त्याचे मोबाईलवर व्हॉटस्अॅप स्टेटसला आक्षेपार्ह मजकूर ठेवून सामाजिक भावना दुखावल्या आहेत आणि जातीय तेढ निर्माण केला आहे.

अजहर असिफ शेख (रा. शेलगाव वांगी ता. करमाळा) याच्या सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवर त्याने काश्मीरमधील पहलगाम येथील दहशवादी हल्ल्याच्या समर्थनार्थ समाजात तेढ व तणाव निर्माण होईल असा मजकूर स्टेटसला ठेवून दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुद्ध चिथावणी दिली. तसेच जनतेमध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग केली म्हणून बजरंग दलाचे लक्ष्मण बबन साखरे यांनी करमाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 299 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री