Thursday, November 13, 2025 01:18:05 PM

Bengluru Crime : क्रूरतेचा कळस ! लिफ्टमध्ये जाताच कुत्र्याच्या एका पिल्लाला आपटून मारलं, दुसरं भेदरलं आणि..., धक्कादायक व्हिडीओ समोर

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

bengluru crime  क्रूरतेचा कळस  लिफ्टमध्ये जाताच कुत्र्याच्या एका पिल्लाला आपटून मारलं दुसरं भेदरलं आणि धक्कादायक व्हिडीओ समोर

आजकाल मनुष्य अधिक अमानुष होत असल्याचे दिसून येत आहे. प्राण्यांबरोबरही क्रूरता करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता  बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका मोलकरणीने तिच्या मालकिणीच्या पाळीव कुत्र्याला मारहाण करून हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,  ही घटना शुक्रवारी घडली. उत्तर बेंगळुरूच्या बागलूर भागात एका अपार्टमेंटमध्ये एक कुटुंब राहते. कुटुंबाने त्यांच्या 4 वर्षांच्या पाळीव कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी पुष्पलता नावाच्या एका मोलकरीणला मासिक 23000 रुपये पगारावर ठेवले होते. दरम्याने समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला दोन कुत्र्यांसह अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसते. लिफ्टचे दरवाजे बंद होताच, ती क्षणभर कुत्र्याकडे पाहते नंतर त्याचा पट्टा ओढून जमिनीवर फेकते.

हेही वाचा - Rohit Arya Case: पवईतील आर. ए. स्टुडिओ प्रकरणात नवे उघड: रोहित आर्याशी संपर्कात असलेले मराठी कलाकार चौकशीच्या रडारवर 

त्यानंतर   लिफ्टचा दरवाजा उघडताच, दुसरा कुत्रा लिफ्टमधून बाहेर पडतो, तर आरोपी पुष्पलता मृत कुत्र्याचा मृतदेह ओढून बाहेर काढतो. कुत्र्याच्या मृत्यूनंतर जेव्हा मालकाने पुष्पलताला विचारले तेव्हा तिने काहीही माहित नसल्याचे सांगितले. आता, व्हिडिओ समोर आल्यानंतर, प्राण्यांवर क्रूरतेचा आरोप करणारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पुष्पलता यांना अटक केली आहे आणि प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



सम्बन्धित सामग्री