Sunday, November 16, 2025 06:50:07 PM

MBBS Seats: मोठी बातमी! 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी देशभरात 10,650 नवीन MBBS जागांना मंजुरी

NMC चे प्रमुख डॉ. अभिजात शेठ यांनी सांगितले की, या वर्षी 41 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत असून त्यामुळे भारतातील एकूण वैद्यकीय संस्थांची संख्या 816 वर पोहोचली आहे.

mbbs seats मोठी बातमी 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी देशभरात 10650 नवीन mbbs जागांना मंजुरी

MBBS Seats: भारतातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी 10,650 नवीन एमबीबीएस जागांना मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींमध्ये मोठी वाढ होणार आहे. NMC चे प्रमुख डॉ. अभिजात शेठ यांनी सांगितले की, या वर्षी 41 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत असून त्यामुळे भारतातील एकूण वैद्यकीय संस्थांची संख्या 816 वर पोहोचली आहे. त्यांनी सांगितले की, या सर्व महाविद्यालयांना मिळून 10,650 नवीन एमबीबीएस जागांची परवानगी देण्यात आली आहे.

यामुळे 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएसच्या एकूण जागांची संख्या 1,37,600 वर जाणार आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (INI) मधील जागांचाही समावेश असेल. NMC ला या वर्षी 3,500 हून अधिक नवीन आणि नूतनीकरण केलेल्या पदव्युत्तर (PG) जागांसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. डॉ. शेठ यांच्या मते, देशभरात 5,000 नवीन पीजी जागा वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पदव्युत्तर जागांची एकूण संख्या 67,000 होईल.

हेही वाचा - Indian Army Recruitment 2025 : भारतीय लष्करात अधिकारी बनण्याची संधी; अर्ज करण्याची प्रक्रिया, वयोमर्यादा वाचा एका क्लिकवर

एकूणच, या वर्षी पदवी आणि पदव्युत्तर मिळून सुमारे 15,000 जागांची वाढ होणार आहे. दरम्यान, NMC ने सांगितले की आगामी शैक्षणिक वर्षासाठी मान्यता, परीक्षा आणि सीट मॅट्रिक्स मंजुरीसाठी वेळापत्रकाचा सविस्तर आराखडा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. तसेच, 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्यासाठी पोर्टल नोव्हेंबरच्या सुरुवातीला उघडले जाईल.

हेही वाचा - Reality of Medical Colleges : 'प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज' योजनेतील धक्कादायक वास्तव उघड; रिकामे वर्ग, प्राध्यापकांविना प्रशिक्षण अन् ..

डॉ. शेठ यांनी विशेष नमूद केले की, अलीकडील काळात पहिल्यांदाच वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग बोर्ड (MARB) च्या निर्णयांविरुद्ध आलेली सर्व अपील न्यायालयीन हस्तक्षेपाशिवाय निकाली काढण्यात आली आहेत. या निर्णयामुळे भारतातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेला मोठी चालना मिळेल आणि ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री