Thursday, November 13, 2025 06:55:26 AM

Air India Bus Fire: मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या बसला आग; पाहा व्हिडीओ

air india bus fire मोठी बातमी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या बसला आग पाहा व्हिडीओ

Air India Bus Fire: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर मंगळवारी दुपारी एअर इंडियाच्या बसला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच विमान बचाव आणि अग्निशमन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली. सुदैवाने, बस रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा - वृक्षपुनर्रोपण ही 'बनावट प्रक्रिया'; 'जीएमएलआर'सह मेट्रो प्रकल्पांच्या वृक्षतोड परवानग्या रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा!

विमानतळ प्रशासनाचे निवेदन

दिल्ली विमानतळ प्राधिकरणाने ‘X’ (पूर्वी ट्विटर) वर निवेदन जारी करत सांगितले की, 'आज दुपारी एका ग्राउंड हँडलरच्या बसला किरकोळ आग लागली. आमच्या तज्ज्ञ ARFF टीमने तत्काळ प्रतिसाद देत काही मिनिटांत आग विझवली. घटनेच्या वेळी बस पूर्णपणे रिकामी होती. घटनेच्या वेळी कोणतीही दुखापत झाली नाही. विमानतळावरील सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहेत.' तथापी, विमानतळ प्रशासनाने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Cyclone Montha : चक्रीवादळ ‘मोंथा’चा तडाखा! विमानसेवा आणि रेल्वे वाहतूकीवर मोठा परिणाम, जाणून घ्या

विजयवाडा विमानतळावरही आग

दरम्यान, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील गन्नवरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांच्या खोलीत आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत सॉफ्टवेअर उपकरणे, एसी आणि काही कागदपत्रे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 


सम्बन्धित सामग्री