Raja Raghuvanshi Murder Case
Edited Image
Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आज मोठा खुलासा झाला आहे. मंगळवारी सोनमसह सर्व आरोपींना राजाची हत्या झालेल्या ठिकाणी नेण्यात आले होते. तिथेच खुनाचे दृश्य पुन्हा तयार करण्यात आले. यादरम्यान अनेक खुलासे झाले. राजाच्या हत्येत एक नाही तर दोन शस्त्रे वापरण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आता उघडकीस आला आहे. राजाच्या हत्येसाठी दोन धारदार शस्त्रे वापरण्यात आली होती. एक शस्त्र केशरी रंगाचे होते, जे जप्त करण्यात आले आहे, तर दुसऱ्या शस्त्राचा शोध सुरू आहे. पोलीस आजच दुसरे शस्त्र जप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोनमसमोरचं करण्यात आली राजाची हत्या -
दरम्यान, मंगळवारी राजा रघुवंशी प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणी आणले. पोलिस आरोपींना स्कूटी पार्क केलेल्या ठिकाणीही घेऊन गेले. पोलिसांनी आरोपींना राजाने स्कूटी सुरू केलेल्या ठिकाणीही नेले. शिलाँगचे एसपी विवेक यांनी सांगितले की, राजाच्या डोक्यावर दोन ठिकाणी जखमांच्या खुणा आहेत. आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, सोनम समोरच राजाचा खून करण्यात आला होता. विशालने प्रथम हल्ला केला, ज्यामुळे रक्त वाहू लागले. त्यानंतर सोनम ओरडून तिथून पळून गेली.
हेही वाचा - Sanam Bewafa: सोनम रघुवंशी प्रकरणाचा 'सनम बेवफा'शी काय संबंध? सोशल मीडियावर ट्रोलचा भडिमार
दरम्यान, ज्या ठिकाणी राजाची हत्या झाली, तिथे दोन्ही आरोपी राजाच्या उजवीकडे आणि डावीकडे उभे होते. ते सोनमच्या इशाऱ्याची वाट पाहत होते. तथापी, सोनमने कबूल केले की राजाची तिच्यासमोर हत्या करण्यात आली. यानंतर सोनमने तिचा एक फोन तोडला आणि तो फेकून दिला. त्यानंतर ती दुसरा फोन घेऊन इंदूरला परतली.
हेही वाचा - राजा रघुवंशी यांची चौथ्या प्रयत्नात करण्यात आली हत्या; मेघालय पोलिसांचा धक्कादायक खुलासा
शिलाँग पोलिस इंदूरमध्येही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आता पोलिस सोनमच्या कुटुंबीयांची चौकशी करणार आहेत. पोलिसांना अजून अनेक प्रश्नांची उत्तर हवी आहेत. पुढील तपासात या हत्याकांडाचा सर्व उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले दुसरे दाओ शस्त्र ज्या खंदकात राजाला फेकण्यात आले होते त्या खंदकात फेकण्यात आले होते. तथापी, राजा रघुवंशी यांच्यावर तीन वेळा हल्ला करण्यात आल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.