Gujarat Cabinet Expansion: गुजरातच्या राजकारणात आज मोठा ट्विस्ट समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या गुजरात सरकारमधील सर्व 16 मंत्र्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना राजीनामे सादर केले आहेत. ही घटना गुरुवार, 16 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री निवासस्थानी पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीनंतर घडली. राजीनामा सादर करण्यापूर्वी सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले.
सर्व राजीनामे आता राज्यपालांकडे पाठवले जातील. मंत्र्यांनी त्यांच्या राजीनाम्यांवर स्वाक्षरी केली असून, यापुढील सूचना अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. गुजरातमधील मंत्रिमंडळ विस्तार प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि सर्वांचे लक्ष नवीन मंत्रिमंडळाच्या घोषणेकडे लागले आहे.
हेही वाचा - Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंच्या हाता-पायाला फ्रॅक्चर?, बँकेतील राड्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमागचे रहस्य काय?
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वतः मंत्र्यांचे राजीनामे मागितले नव्हते. आज दुपारी झालेल्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी एकत्रितपणे राजीनामा सादर करण्याचा निर्णय घेतला. प्राप्त माहितीनुसार, एकूण 16 मंत्र्यांनी सरकारमधून राजीनामा दिला आहे. कारण गुजरातमधील भाजप सरकार त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत आहे.
हेही वाचा - Maithili Thakur: अब्दुल बारी सिद्दीकींच्या बालेकिल्ल्यात भाजपची जोरदार खेळी; अलीनगरवर 'कमळ' फुलवण्यासाठी मैथिली ठाकूर मैदानात
आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक
दरम्यान, 17 ऑक्टोबर 2025 नवीन मंत्र्यांचा महात्मा मंदिरात शपथविधी होणार आहे. तथापि, त्यापूर्वी, राज्य भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी आज रात्री एक महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी होणार आहे. सध्याच्या सरकारमधील सर्व मंत्र्यांना या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. बैठक संघटनेचे अधिकारी देखील उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. राज्यातील या अचानक घडलेल्या राजकीय उलथापालथीमुळे आता सर्वांचे लक्ष नवीन मंत्रिमंडळाच्या रचनेकडे लागले आहे.