Tuesday, November 11, 2025 11:17:54 PM

Bihar election 2025: भाजपने तिकीट दिल्यानंतर मैथिली ठाकूरची चर्चा; जाणून घ्या तिचे वय आणि इंस्टाग्राम फॉलोअर्स

आपल्या दोन भावांसमवेत मैथिलीने एका गाण्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर आणि युट्यूबवर शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ती प्रथम माध्यमांमध्ये चर्चेत आली होती.

bihar election 2025 भाजपने तिकीट दिल्यानंतर मैथिली ठाकूरची चर्चा जाणून घ्या तिचे वय आणि इंस्टाग्राम फॉलोअर्स

पाटणा : सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरने (Maithili Thakur) भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पक्षाने तिला उमेदवारी जाहीर केली आहे. मैथिली आता बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. मैथिलीची लोकप्रियता लक्षात घेऊनच भाजपने तिला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

मैथिलीचे वय आणि विधानसभा उमेदवारीची पात्रता, निकष
मैथिलीचे सध्याचे वय अवघे 25 वर्षे आहे. विधानसभा उमेदवार होण्यासाठी उमेदवारास 25 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असते आणि मैथिलीने 25 जुलै 2025 रोजी वयाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. मैथिलीचा जन्म 25 जुलै 2000 रोजी झाला झाला आहे. मैथिली ठाकूर साधारणत: गेल्या 5 वर्षांपासून सोशल मीडियातून नेटीझन्ससमोर आलेला चेहरा आहे आणि एक प्रसिद्ध गायिका म्हणून तिची देशभरात ओळख आहे.

हेही वाचा - Bihar BJP Candidate List 2025: भाजपकडून बिहार निवडणुकीसाठी 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 7 वेळा आमदार राहिलेले नंद किशोर यादव यांचे तिकीट रद्द

आपल्या दोन भावांसमवेत मैथिलीने एका गाण्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर आणि युट्यूबवर शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ती प्रथम माध्यमांमध्ये चर्चेत आली होती. मैथिलीचे युट्यूबवर 5 मिलियन्स (50 लाख) आणि इंस्टाग्रामवर 6.4 मिलियन्स (64 लाख) फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सध्या तिची लोकप्रियता हाच तिला विधानसभेची उमेदवारी मिळण्याचा निकष ठरल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

मैथिली मूळ बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून येते, पण तिचे शिक्षण आणि संगोपन दिल्लीतच झाले आहे. तिने गायनाचे धडे आणि गाणंही दिल्लीतच शिकली. तिचे वडील रमेश ठाकूर हे संगीतकार आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच तिला घरात शास्त्रीय संगीत आणि गायनाचे वातावरण मिळाले. तिचे वडील रमेश ठाकूर यांच्यामुळेच तिला संगीत आणि गाण्याची आवड निर्माण झाली, तसेच कुटुंबातही सूर आणि ताल पाहायला मिळतो. 

हेही वाचा - Mega Bank Merger : मोठी बातमी! पुढील 2 वर्षांत होणार 'मेगा बँक मर्जर'; देशात फक्त 3 ते 4 मोठ्या बँका उरणार


सम्बन्धित सामग्री