Monday, January 19, 2026 08:10:14 PM

IndiGo Flight Bomb Threat: मुंबई-दिल्ली इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी; विमानतळावर आणीबाणी जाहीर

इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या उड्डाणादरम्यान सुरक्षेचा धोका निर्माण झाल्यानंतर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

indigo flight bomb threat मुंबई-दिल्ली इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी विमानतळावर आणीबाणी जाहीर

IndiGo Flight Bomb Threat : मुंबईहून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगोच्या 6E 762 या विमानाला मंगळवारी सकाळी बॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. या विमानात सुमारे 200 प्रवासी होते. इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या उड्डाणादरम्यान सुरक्षेचा धोका निर्माण झाल्यानंतर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा तपासणी करूनच विमानाला पुढील परवानगी देण्यात आली.

हेही वाचा - H1b Visa Policy New Update : H-1B गोंधळात भारतीयांना जर्मनीचा आधार; ‘स्थिर व उदार’ स्थलांतर धोरणांची हमी

वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, सकाळी 7.53 च्या सुमारास हे एअरबस A321 निओ विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरले. सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केली असता काहीही तथ्य नसल्याचे आढळले.

हेही वाचा - Saving Scheme Interest Rate Cuts: PPF, NSC आणि इतर बचत योजनांवर व्याजदर घटणार?; गुंतवणूकदारांसाठी सरकारचा मोठा निर्णय लवकरच

दरम्यान, प्रवाशांना कमीतकमी गैरसोय होण्यासाठी कंपनीने अल्पोपहाराची सोय केली. तसेच प्रवाशांना नियमित अपडेट्स देण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अधिकृत तपास सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री