Sunday, February 09, 2025 05:55:26 PM

What are the economic announcements in the budget?
BUDGET 2025 : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. कृषी, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्या.

budget 2025  अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा कोणत्या

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. कृषी, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्या. अर्थसंकल्पात आयकराविषयी महत्त्वाची घोषणा करण्यात आल्या. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा


आयकर भरण्याची मर्यादा 4 वर्षांपर्यंत वाढवली. 4 वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरू शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली. 
सूक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी 5 कोटींवरून 10 कोटी करण्यात आली. 
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली. यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. 
कृषी सेक्टरसाठी बजेटमधून मोठ्या घोषणा करण्यात आल्या. तूर, उडीद, मसूर यांचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. डाळींमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी 6 वर्षांचा कार्यक्रम आहे.  
फळं, भाजी उत्पादकांसाठी विशेष योजनेविषयीची घोषणा करण्यात आली.  
कापूस उत्पादकांवर भर देण्यासाठी नवीन योजना आणल्या जाणार आहेत. 

हेही वाचा : Union Budget 2025: अर्थसंकल्पातून पगारदारांना दिलासा


किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. 
मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना, 5 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. 
स्टार्ट अप्ससासाठी 10 कोटीवरुन 20 कोटींची क्रेडीट लिमिट करण्यात आली आहे. 
चामड्याची पादत्राणं बनवण्यांसाठी विशेष योजना आणली आहे. 
भारताला खेळण्यांच्या क्षेत्रात ग्लोबल हब बनवणार आहे. 
भारतीय भाषांमधील पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येणार आहे.   
आयआयटींची क्षमता वाढवली असून 6500 जागा वाढवल्या आहेत. 

हेही वाचा : Union Budget 2025: अर्थसंकल्पातून काय स्वस्त, काय महाग?

एआयच्या अभ्यासासाठी तीन केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच कृषी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर करण्यात येणार आहे. 
वैद्यकीय महाविद्यालयात पुढील 5 वर्षांत 10 हजार जागा वाढवणार आहेत.  
कॅन्सरवरील 36 औषधं पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहेत. 
विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता दिली आहे. 
जन भागीदारी योजनेतून ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी देण्याचे काम केले जाणार आहे. 
उडान योजना नव्याने स्थापन, पुढील 10 वर्षात 120 नवी ठिकाणं जोडणार 
2025 मध्ये आणखी 40 हजार नागरिकाचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 
शहरी कामगारांचं जीवन उंचवण्यासाठी विशेष योजना आणल्या जाणार आहेत.  
50 नवी पर्यटक स्थळं विकसित केली जाणार आहेत.  
भगवान बुद्धांशी संबंधित जागांचा विकास करण्यात येणार आहे. 
सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना आणली जाणार आहे. 


सम्बन्धित सामग्री