Sunday, February 08, 2026 05:27:20 PM

Shrikant Badve: एका मराठी माणसाचा सामान्यपासून ते असामान्य बनण्यापर्यंतचा प्रवास! जाणून घ्या, कोण आहेत श्रीकांत बडवे?

कोणताही मोठा वारसा, घराणेशाही नसताना सामान्यपासून असामान्य बनण्यापर्यंत यशस्वी वाटचाल केलेले श्रीकांत बडवे कोण आहेत, ज्यांचा आता अब्जाधीशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे, जाणून घेऊ..

shrikant badve एका मराठी माणसाचा सामान्यपासून ते असामान्य बनण्यापर्यंतचा प्रवास जाणून घ्या कोण आहेत श्रीकांत बडवे

Marathi Manus Becomes Billionaire : भारतातील अब्जाधीशांच्या यादीत आता आणखी एका मराठी नावाचा समावेश झाला आहे! महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि आपल्या मेहनतीच्या बळावर उद्योगविश्व गाजवणाऱ्या श्रीकांत बडवे यांनी अब्जाधीशांच्या क्लबमध्ये (Billionaire Club) अधिकृतपणे प्रवेश केला आहे. ते बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Belrise Industries Ltd.) प्रमोटर आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) आहेत. त्यांच्याकडे कोणताही मोठा वारसा किंवा घराणेशाही नसताना केवळ कष्ट, मेहनत आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी हे मोठे साम्राज्य उभारले आहे.
श्रीकांत बडवे यांच्याकडे ना कुणाचे मोठे नाव होते, ना वारसा, ना घराणेशाही! केवळ अक्कलहुशारी, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर आज ते या ठिकाणी पोहोचले आहेत.

शेअर्सची सुसाट कामगिरी आणि संपत्तीतील वाढ
श्रीकांत बडवे अब्जाधीश बनण्यामागे त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली लक्षणीय वाढ हे प्रमुख कारण आहे. बेलराईज इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी अलीकडेच आतापर्यंतचा उच्चांक गाठला. 28  मे पासून कंपनीचे शेअर्स जवळपास 83 टक्क्यांनी वाढले असून, 90 रुपयांवर सूचिबद्ध झालेला हा स्टॉक आता 166 रुपयांवर व्यवहार करत आहे. श्रीकांत बडवे यांचा कंपनीत अंदाजे 59.56 टक्के हिस्सा आहे, ज्याचे बाजार मूल्य सुमारे 9,550 कोटी रुपये आहे.

हेही वाचा - RBI News : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा महत्त्वाचा निर्णय; मृत खातेदारांच्या दाव्यांचे निवारण 15 दिवसांत होणार

माधुरी-सचिनसोबत केले काम
श्रीकांत बडवे यांचे केवळ उद्योगजगतापुरतेच नव्हे, तर राज्य सरकारच्या धोरणांमध्येही महत्त्वाचे योगदान आहे. ते महाराष्ट्र सरकारच्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या उपक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर राहिले आहेत. विशेष म्हणजे, या भूमिकेत त्यांनी क्रिकेटचा शहनशाह सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम केले आहे. यासोबतच त्यांनी 'मेक इन इंडिया' उपक्रमाचेही ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम पाहिले आहे.

छोट्या सुरुवातीतून उभी राहिली 'बेलराईज इंडस्ट्रीज'
श्रीकांत बडवे यांनी 1988 मध्ये केवळ तीन कर्मचाऱ्यांसह बेलराईज ग्रुपचा (तत्कालीन बडवे इंजिनीअरिंग) पाया रचला होता. आज हा समूह भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग ग्रुपपैकी एक बनला आहे. देशभरात कंपनीचे 17 हून अधिक कारखाना युनिट्स असून, ते 8000 हून अधिक लोकांना रोजगार देतात. कंपनीची वार्षिक उलाढाल 7000 कोटींपेक्षा जास्त आहे. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठी पार्ट्स बनवणाऱ्या बेलराईजचा दुचाकी धातूच्या कंपोनंट मार्केटमध्ये 24 टक्के बाजार हिस्सा आहे, ज्यामुळे ते देशातील टॉप तीन कंपन्यांपैकी एक आहेत.

हेही वाचा - Small Saving Schemes: PPF, SSY, NSC सह लघु बचत योजनांवर किती व्याज मिळेल? 30 सप्टेंबरला जाहीर होणार नवीन व्याजदर


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या