Monday, November 17, 2025 12:58:27 AM

RBI Silver Loan Rules: सोन्याप्रमाणे चांदी गहाण ठेवता येते का? काय आहेत RBI चा नियम? जाणून घ्या

आरबीआयच्या नियमांनुसार, बुलियन, बार, ईटीएफ, म्युच्युअल फंड्स यावर कर्ज मिळणार नाही. आधीच गहाण ठेवलेली चांदी किंवा सोनं पुन्हा तारण ठेवता येणार नाही.

rbi silver loan rules सोन्याप्रमाणे चांदी गहाण ठेवता येते का काय आहेत rbi चा नियम जाणून घ्या

RBI Silver Loan Rules: आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासल्यास अनेक जण सोनं गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतात. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोन्याबरोबरच चांदीवरही कर्ज घेण्याचा मार्ग खुला केला आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून हा नवा नियम लागू होणार आहे.

काय आहे आरबीआयचा नवा नियम?

आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व बँका आणि नियमन केलेले कर्जदार आता सोन्यासारखेच चांदीवर कर्ज निधी मिळवू शकतात. म्हणजेच लोकांना आता चांदी गहाण ठेवूनसुद्धा कर्ज मिळू शकेल. हा निर्णय सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त चांदी किंवा सोन्याचे दागिने आणि नाणी यांच्यावरच कर्ज देऊ शकतात. तथापी, बुलियन, बार, ईटीएफ, म्युच्युअल फंड्स यावर कर्ज मिळणार नाही. आधीच गहाण ठेवलेली चांदी किंवा सोनं पुन्हा तारण ठेवता येणार नाही.

हेही वाचा - 8th Pay Commission: मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आठव्या वेतन आयोगाला मान्यता

सर्व बँका चांदीवर कर्ज देतील का?

काही राष्ट्रीयकृत आणि खासगी बँका चांदीला तारण म्हणून मान्यता देत नाहीत. मात्र काही सहकारी बँका आणि एनबीएफसी (NBFC) संस्थांनी चांदीवर कर्ज देण्यास सुरुवात केली आहे.

सध्याच्या चांदीच्या किंमती

चेन्नई, हैदराबाद, केरळ: 1,65,000 प्रति किलो
मुंबई, दिल्ली, पुणे: 1,54,900 प्रति किलो

हेही वाचा - Rupees Vrs Dollar: डॉलरसमोर रुपया पुन्हा कोसळला; कच्च्या तेलाच्या भाववाढीचा फटका

याचा फायदा कोणाला होणार?

दरम्यान, हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहक, लहान व्यावसायिक आणि चांदीचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. कारण सोन्याप्रमाणेच आता चांदीही एक तरल मालमत्ता (Liquid Asset) म्हणून वापरता येईल. तथापी, आर्थिक तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय कर्ज बाजारात स्पर्धा वाढवेल आणि ग्रामीण भागातील कर्ज वितरण अधिक सुलभ करेल.  
 


सम्बन्धित सामग्री