देश : सद्या अपघाताचे सत्र वाढत असल्याच पाहायला मिळतंय. यातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाची घोषणा केलीय. अपघातातील जखमींसाठी आता 'कॅशलेस ट्रीटमेंट' योजना जाहीर करण्यात आलीय. महत्वाचे म्हणजे योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून जखमींचा एकूण 1.5 लाखांपर्यंतचा खर्च केला जाणार आहे. सद्या या योजनेवर काम सुरु असून लवकरच ही योजना अंमलात आणणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय आहे 'कॅशलेस ट्रीटमेंट' योजना?
केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी 'कॅशलेस ट्रीटमेंट' योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी दीड लाख रुपये दिले जाणार आहे किंवा जखमींचा सात दिवसांच्या उपचाराचा खर्च आता केंद्र सरकार उचलणार आहे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
काय म्हणाले मंत्री नितीन गडकरी?
"आम्ही कॅशलेस ट्रीटमेंट ही नवी योजना सुरु केली आहे. अपघात झाल्यानंतर 24 तासांच्या आत, जेव्हा माहिती पोलिसांपर्यंत जाईल तेव्हापासून संबंधित जखमीचा रुग्णालयातील सात दिवसांचा, 1.5 लाखांपर्यंतचा उपचार खर्च केला जाईल. हिट अँड रन प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत देऊ". आम्ही मार्चपर्यंत नव्याने बदल करण्यात आलेली योजना आणू असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.