Friday, March 13, 2026 01:47:39 PM

US Israel-Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा बोर्ड परीक्षांवर परिणाम? CBSE ने केला मोठा खुलासा

इयत्ता दहावीसाठी देशभरासह परदेशातील 8,074 परीक्षा केंद्रांवर, तर इयत्ता 12वीसाठी 7,574 केंद्रांवर परीक्षा घेतल्या जात आहेत.

us israel-iran war  अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा बोर्ड परीक्षांवर परिणाम cbse ने केला मोठा खुलासा

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education, CBSE) मध्यपूर्व (Middle East) देशांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाल्याच्या अफवांवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेले परिपत्रक पूर्णपणे बनावट (Fake) असल्याचे सीबीएसईने स्पष्ट करत विद्यार्थ्यांना चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे मंडळाने सांगितले आहे.

सध्या सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरळीत सुरू आहेत. इयत्ता दहावीसाठी देशभरासह परदेशातील 8,074 परीक्षा केंद्रांवर, तर इयत्ता 12वीसाठी 7,574 केंद्रांवर परीक्षा घेतल्या जात आहेत. भारतासह 26 देशांमध्ये एकूण 43 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षांना बसत आहेत.

हेही वाचा: Holika Dahan Puja Samagri List: होळीच्या पूजेसाठी कोणत्या वस्तू आवश्यक? पहा पूजा साहित्याची संपूर्ण यादी एका क्लिकवर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बनावट नोटीसमध्ये जागतिक तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांतील परीक्षा रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामध्ये भाषा विषयांच्या परीक्षा 28 फेब्रुवारीपर्यंत स्थगित केल्याचे तसेच 7 मार्च 2026 रोजी होणारी इयत्ता दहावीची सामाजिक शास्त्र (Social Science) परीक्षा रद्द केल्याचेही नमूद करण्यात आले होते. मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

सीबीएसईने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत पोस्ट करत विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ www.cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीलाच विश्वास ठेवावा, असेही मंडळाने सांगितले आहे. लवकरच सविस्तर स्पष्टीकरण जारी केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. यावर्षी इयत्ता दहावीसाठी सुमारे 25 लाख विद्यार्थी परीक्षा देत असून त्यामध्ये अंदाजे 14 लाख मुळे आणि 10.9 लाख मुलींचा समावेश आहे. तसेच इयत्ता बारावीवीच्या परीक्षेसाठी सुमारे 18.5 लाख विद्यार्थी सहभागी झाले असून त्यात 10.2 लाख मुले आणि 8.3 लाख मुलींचा समावेश आहे. सीबीएसईने विद्यार्थ्यांनी अफवांपासून दूर राहून परीक्षांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: ICC T20 World Cup 2026: जागतिक तणावात टी-20 विश्वचषक; ICC चे निवेदन आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत काटेकोर उपाययोजना जाहीर


सम्बन्धित सामग्री