Cyclone Montha: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र रविवारी तीव्र कमी दाबात रूपांतरित झाले असून ते हळूहळू पूर्व किनाऱ्याकडे सरकत आहे. यामुळे ओडिशा सरकारने राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालवर देखील वादळाचा प्रचंड फटका बसण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश सरकारने मदत आणि आवश्यक पुरवठ्यासाठी कृती योजना तयार केली असून, सैन्यही हाय अलर्टवर ठेवले आहे.
वादळ कधी धडकणार?
भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, चक्रीवादळ ‘मोंथा’ 28 ऑक्टोबर संध्याकाळी किंवा रात्री 110 किमी/तास वेगाने आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टनम–कलिंगपट्टनम दरम्यानच्या किनाऱ्यावर धडक देण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे ओडिशात 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापी, काही ठिकाणी 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Man Becomes Billionaire in Minutes: काय सांगता!! काही मिनिटांत तरुण बनला अब्जाधीश! खात्यात अचानक जमा झाले 2800 कोटी
अलर्ट जारी
आयएमडीने ओडिशाच्या अनेक दक्षिण आणि किनारी जिल्ह्यांसाठी लाल, नारंगी आणि पिवळा इशारा जारी केला आहे. ओडिशाचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की, राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. कर्मचारी आणि यंत्रणा बचाव आणि मदत कार्यासाठी सज्ज आहेत.
एनडीएमए आणि सैन्य सतर्क
‘मोंथा’ चक्रीवादळामुळे भारतीय लष्कर आणि एनडीएमए पथके हाय अलर्टवर आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालींच्या परिणामामुळे पुढील 48 तासांत वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत वारे वायव्येकडे सरकून नैऋत्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -India China Flights Resume : पाच वर्षांनंतर भारत-चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरू
सरकारी तयारी आणि उपाय
आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम, विजयनगरम, काकीनाडा किनारी जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे जोरदार वारे आणि पूर येण्याचा धोका वाढला आहे. हवामान विभागाकडून लोकांना किनाऱ्यांवर जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. तथापी, सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.