Monday, February 10, 2025 06:30:21 PM

Delhi Assembly elections voting
दिल्ली पोलिस भाजपसाठी काम करताय?

दिल्ली पोलिस भाजपसाठी काम करत आहेत;आतिशी यांचे आरोप

दिल्ली पोलिस भाजपसाठी काम  करताय

दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरु आहे. दिल्लीमध्ये मतदानासाठी सुमारे 13 हजार मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 1.56 कोटी मतदार मतदान करू शकणार आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया ब्लॉकचा भाग असलेल्या पाच पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढाई लढण्याचे ठरवले आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्व 70 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.  

याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) 6 जागांवर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी (सीपीएम) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी लेनिनवादी (सीपीआय-एमएल) प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार उभे करत आहेत. भारतीय जनता पक्ष (भा.ज.पा.) ने 68 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आघाडीतील पक्षांना दोन जागा दिल्या आहेत. जेडीयूने बुरारी येथून उमेदवार उभा केला आहे आणि एलजेपी-आर ने देवली मतदारसंघात उमेदवार उभा केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

एकनाथ शिंदेंचा भाजपला सर्व जागांवर पाठिंबा: 
भाजपला सर्मथन देणारा महाराष्ट्रातील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) 30 जागांवर निवडणूक लढवतो आहे. शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला सर्व जागांवर पाठिंबा दिला आहे. तसेच बहुजन समाज पक्ष (बसपा) 70 जागांवर आणि असदुद्दीन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) 12 जागांवर निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत.

आतिशी यांचे आरोप: 
आतिशी यांनी निवडणुकीबद्दल बोलताना म्हटले की, “ही निवडणूक केवळ एक सामान्य निवडणूक नाही, तर ती एक धार्मिक युद्ध आहे. ही सत्य आणि असत्यामधील लढाई आहे. दिल्लीतील लोक सुशिक्षित आणि प्रामाणिक लोकांना विजयी करण्यासाठी मतदान करतील.” दिल्ली पोलिसांच्या कामकाजावर टीका करत असताना त्यांनी सांगितले की, "दिल्ली पोलिस भाजपच्या वतीने काम करत आहेत आणि भाजप मतदारांना घाबरवत आहे."

हेही वाचा :  लगीन माझ्या विठ्ठल-रुक्मिणीच

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी दिल्लीतील कामराज लेन येथे मतदान केले. त्यांनी मतदान केंद्रावर एक टिप्पणी लिहून, "लोकशाहीचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदानाचा हक्क वापरावा." भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी दिल्लीत लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची आवश्यकता व्यक्त केली आणि दिल्लीतील सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

मतदान प्रक्रिया थांबवली? 
आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्ला खान यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी काही मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. कालकाजी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अलका लांबा आणि त्यांचे वडील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी व्हीव्हीपॅटमध्ये काही अडचणी आल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली.
 


सम्बन्धित सामग्री