दिल्लीकर उद्या ठरणार राजधानीत सत्ता कोणाची?
Edited Image
Delhi Election 2025: दिल्ली विधानसभेचा निवडणूक प्रचार सोमवारी संध्याकाळी सहा वाजता संपला. आरोप प्रत्यारोप आणि गाजत असलेल्या राजधानीत विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या. विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा रोडशो घेत तसेच घरोघरी संपर्क साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीत सत्तांतर होणार की सत्ता टिकविण्यात आप पक्षाला यश येणार याचा निर्णय मतदार आता उद्या मतदान स्वरुपात जनता देणार आहे. दिल्ललीत 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. दिल्लीतील एक कोटी 56 लाख 14 हजार मतदार भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांसह एकूण 699 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
राजकारण्यांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार -
दिल्ली विधानसभा करिता विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून सभांचा सपाटा सुरू होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीपी नेड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, प्रवेश वर्मा यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी दिल्लीत जोरदार प्रचार केला. तर आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्री अतिशी, अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मनीष सिसोदिया आदींनी प्रचाराची धुरा सांभाळली. काँग्रेस तर्फे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रचार केला.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्व पक्षांच्या नेत्यांनी पदयात्रा आणि सभाद्वारे त्याचप्रमाणे मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला. मुख्यमंत्री अतीशी यांच्या प्रचारासाठी कालकाजी येथे रोडशो काढण्यात आला. दुसरीकडे अनेक ठिकाणी केजरीवाल यांच्या जाहीर सभा झाल्या. तिन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावली
मतदानाच्या 48 तास आधी प्रचार संपतो -
मतदान आठवड्याच्या नियोजित वेळेच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार थांबवावा लागतो. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी सहा वाजता निवडणूक प्रचार संपला. यानंतर, राजकीय पक्ष आणि उमेदवार कोणतीही निवडणूक सभा, रॅली, रोड शो, पदयात्रा इत्यादी आयोजित करू शकत नाहीत. याशिवाय, निवडणूक आयोगाकडून कोणत्याही ऑडिओ किंवा व्हिडिओद्वारेही निवडणूक प्रचाराला परवानगी दिली जाणार नाही.