मुंबई : फेब्रुवारी महिना आला म्हटलं कि सगळ्यांना आठवतो ते व्हॅलेंटाईन वीक. याच व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्याच दिवशी रोज डे साजरा केला जातो. या रोज डे लोक आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाब देतात. हेच गुलाब देऊन आपल्या प्रिय व्यक्तीला रोज डे च्या शुभेच्छा देतात.
गुलाब म्हटलं कि प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. बऱ्याच लोकांना गुलाब आवडते. प्रेम व्यक्त करण्यासाठीही गुलाबाचा उपयोज केला जातो. आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊन प्रेम व्यक्त केले जाते. आज रोज डे च्या निमित्ताने बरेच लोक गुलाब खरेदी करतात. परंतु जगातील सव्रात महागडे गुलाब तुम्हाला माहिती आहे का?
हेही वाचा : कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी ई-नाम प्लॅटफॉर्मचा विस्तार; ई-नाम प्लॅटफॉर्मवरील वस्तूंची संख्या पोहोचली 231 वर
जगातील सर्वात महागडे गुलाब
जगातील सर्वात महागडा गुलाब म्हणजे ज्युलियट रोज होय. ज्युलियट रोज हा अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा गुलाब आहे. तो क्वचितच आढळला जातो. प्रसिद्ध फुलविक्रेते डेव्हिड ऑस्टिन यांनी अनेक गुलाब एकत्र करून ज्युलियट रोजची निर्मिती केली. पराग नेशनने दिलेल्या वृत्तानुसार, apricot-hued hybrid नावाची ही दुर्मिळ प्रजाती तयार करण्यासाठी त्यांना 15 वर्षे लागली. 2006 मध्ये त्यांनी ते 10 मिलियन पाउंड म्हणजेच 900 कोटी रुपयांना गुलाब विकला.
ज्युलियट गुलाबाची किंंमत किती?
ज्युलियट रोज हे गुलाब इतके महाग आहे असून श्रीमंत लोकांनाही ते विकत घेण्यापूर्वी दहा वेळा विचार करायला लावणारा आहे. सध्या याची किंमत 15.8 अमेरिकन डॉलर आहे. भारतीय चलनात ही किंमत 1,38,33,68,063 रुपये आहे. या गुलाबाच्या सुगंधाबद्दल बोलायचे झाले तर त्यात सूक्ष्म चहाचा सुगंध आहे. या गुलाब फुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते 3 वर्षे ताजे टवटवीत राहते. याचबरोबर कुडूपाल फ्लॉवर नावाच्या गुलाबाची गणनाही जगातील महागड्या फुलांमध्ये केली जाते. त्याला भूतिया फूल या नावानेही ओळखले जाते. विशेष म्हणजे कुडूपालचे फूल फक्त रात्रीच फुलते. ते फक्त श्रीलंकेत आढळते.