surgery प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image प्रतिकात्मक प्रतिमा
Fake Doctor News: लोक ज्यांना देव मानतात ते डॉक्टरचं खोटे असतील तर? असाच एक बनावट डॉक्टर समोर आला आहे जो अनेक वर्षांपासून लोकांच्या जीवाशी खेळत होता. हृदयरोगतज्ज्ञ असल्याचा दावा करणारा 47 वर्षीय नरेंद्र विक्रमादित्य यादव हा बनावट डॉक्टर असल्याचं समोर आलं आहे. त्याच्याकडे असलेल्या दोन पदव्युत्तर पदव्या बनावट असल्याचे आढळून आले. एवढेच नाही तर त्यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या सात राज्यांमधील नामांकित रुग्णालयांमध्ये वर्षानुवर्षे काम केले आहे. नरेंद्र यादवने बनावट पदवी देऊन लोकांना फसवलेच नाही तर त्याने स्वतःची इंग्लंडचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ अशी ओळख तयार केली. त्याने पोलिस कारवाई टाळण्यासाठी बनावट पत्नी आणि मुलांबद्दल कथा देखील रचली.
रुग्णाच्या मृत्यूनंतर उघडकीस आले सत्य -
या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेशातील दमोह येथील मिशन रुग्णालयात सात रुग्णांच्या मृत्यूनंतर ही चौकशी सुरू करण्यात आली. मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानुंगो आणि इतर स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून जेव्हा तपास वाढला तेव्हा यादवबद्दलचे सत्य समोर आले.
हेही वाचा - 'भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध एकत्र'; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केले निवेदन
बनावट डॉक्टराने चोरली रुग्णालयातील ईसीजी मशीन -
1 जानेवारी रोजी दामोहच्या मिशन हॉस्पिटलमध्ये नियुक्त झालेल्या यादवने केवळ रुग्णांवर उपचार केले नाहीत तर रुग्णालयातील ईसीजी मशीनही चोरली आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला तो गायब झाला. दमोह पोलिसांनी यादवला प्रयागराज येथून अटक केली. तथापी, यादवने इंग्लंड आणि अमेरिकेतील अनेक वैद्यकीय संस्थांमधून प्रशिक्षित असल्याचा दावा करून मोठ्या रुग्णालयांमध्ये काम केले. त्यांने एस्कॉर्ट्स, फोर्टिस, अपोलो सारख्या नामांकित रुग्णालयांमध्ये सेवा दिली.
हेही वाचा - Tahawwur Rana : लँडिंगनंतर तहव्वूर राणाचा पहिला फोटो आला समोर; आता फासावर लटकणार की तुरुंगात सडणार?
दरम्यान, 2006 मध्ये छत्तीसगड विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र शुक्ला यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने यादव यांनी चुकीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप केला. यानंतर त्याच्याविरुद्ध अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या. राजेंद्र शुक्ला यांचा मुलगा प्रदीप यांनी सांगितले की, यादव यांनी माझ्या वडिलांवर शस्त्रक्रिया केली होती, त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यापूर्वी 18 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नंतर, आम्हाला कळले की तो पात्र डॉक्टर नव्हता.