गेल्या काही महिन्यांपासून भारतावर असलेली टॅरिफची टांगती तलवार आता कमी झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ 25 % वरून 18% पर्यंत कमी केले आहे. यादरम्यान भारत अमेरिका आणि प्रामुख्यानं व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करतील, असा दावा ट्रम्प यांनी केला. यामुळं रशिया आणि यूक्रेन युद्ध थांबवण्यास मदत होईल. तसेच कर 18% वरून शून्यावर आणण्याबाबत भाष्य केले आहे. यामुळे भारतीयांना या करारामुळे दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा- Budget 2026 : कोणाला मिळाला अर्थसंकल्पाचा मोठा वाटा? जाणून घ्या सविस्तर
यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "आज सकाळी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलणे हा सन्मानाचा अनुभव होता. ते माझे सर्वात मोठे मित्र आहेत आणि त्यांच्या देशाचे एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया आणि युक्रेनशी युद्ध संपवण्यासह अनेक गोष्टींबद्दल बोललो. त्यांनी रशियन तेल खरेदी करणे थांबवण्यास आणि अमेरिकेकडून आणि संभाव्यतः व्हेनेझुएलाकडून बरेच काही खरेदी करण्यास सहमती दर्शविली. यामुळे युक्रेनमधील युद्ध संपण्यास मदत होईल, जे सध्या सुरू आहे, ज्यामध्ये दर आठवड्याला हजारो लोक मरत आहेत! पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर आणि त्यांच्या विनंतीनुसार, तात्काळ प्रभावीपणे, आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शविली, ज्याद्वारे अमेरिका कमीत कमी परस्पर शुल्क आकारेल, ते 25% वरून 18% पर्यंत कमी करेल. ते अमेरिकेविरुद्धचे त्यांचे शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्यावर आणण्यासाठी देखील पुढे जातील. पंतप्रधानांनी 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा आणि इतर अनेक उत्पादनांसह "अमेरिकन खरेदी" करण्याचे वचन दिले. भारतासोबतचे आमचे अद्भुत संबंध पुढे आणखी मजबूत होतील. पंतप्रधान मोदी आणि मी असे दोन लोक आहोत जे गोष्टी पूर्ण करतात, जे बहुतेकांसाठी सांगता येत नाही. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!"
हेही वाचा- UPI transactions: जानेवारीत UPI ने गाठला विक्रमी टप्पा, तब्बल 28.33 लाख कोटींचे व्यवहार, देशभर डिजिटल क्रांतीला गती
याचनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत म्हटले की, "आज माझे प्रिय मित्र राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी बोलणे खूप छान वाटले. भारतात बनवलेल्या उत्पादनांवर आता 18% कर कमी होणार आहे याचा आनंद झाला. या अद्भुत घोषणेबद्दल भारतातील 1.4 अब्ज जनतेच्या वतीने राष्ट्रपती ट्रम्प यांचे खूप खूप आभार. जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात तेव्हा ते आपल्या लोकांना लाभदायक ठरते आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध करून देते. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देतो. आमची भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे."